जत : बेंळूखीतील मतदारांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना सर्वाधिक मताधिक्य दिले आहे.त्यामुळे आम्ही बेंळूखीतील विकासासाठी कठिबंध्द आहोत.येत्या काळात बेंळूखीसाठी चांगला विकास निधी देऊ,असे आश्वासन आ.पडळकर यांचे बंन्धू तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी दिले.त्याचबरोबर येत्या काळात जत तालुक्यातील चित्र बदललेले असेल.तालुक्यातील जनतेने आम्हच्यावर मोठा विश्वास दाखविला आहे.तो विकासकामातून सार्थ ठरवू असे पडळकर म्हणाले.
बेंळूखीचे नेते तथा सोसायटी संचालक विजय चव्हाण यांनी ब्रम्हानंद पडळकर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.यावेळी पडळकर बोलत होते.दरम्यान विजय चव्हाण दांपत्यांचा पडळकर यांनी सत्कार केला.