जतमध्ये अवैध वेश्या व्यवसाय; सहा महिलांची सुटका

0
850

लॉजवर पोलिसांची कारवाई; बंगाल, पुणे, मुंबई, नाशिक येथील महिला; सहा जणांवर गुन्हा

जत : शहरातील लॉजवर अनेक महिन्यांपासून ऑनलाइन वेश्या व्यवसाय जोरात सुरू आहे. पोलिसांची धडक कारवाईची अपेक्षा जतकर करत असतानाच जत व सांगली येथील टीमने संयुक्त कारवाई करत लॉजवर छापे टाकले. शहरातील तीन लॉजवर बंगाल, पुणे, नाशिक येथील मुली, महिला आणून वेश्या व्यवसाय करत असल्याचे उघड झाले आहे.

जत पोलिसांनी शहरातील बिळूर रोडवरील श्रम विलास लॉज, हॉटेल आशीर्वाद पॅलेस, रॉयल हिल स्टेशन हॉटेल येथे शुक्रवारी छापा टाकला. यात बंगालमधील तीन महिला, नवी मुंबई, नाशिक, पुणे येथील प्रत्येकी एक जण वेश्या व्यवसाय करत असल्याचे दिसून आले. या महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी जत शहरातील मंदार मारुती माने (रा. रामराव नगर), आकाश विलास दोडमणी (रा. घाडगेवाडी रोड दुधाळ वस्ती), स्वप्निल नाटेकर (रा. विद्या नगर), सतीश घाडगे (रा. शिवाजी पेठ मकानदार गल्ली), संतोष श्रीकांत संगोजी (रा. छत्रीबाग रोड) व महांतेश मुकेश सनके (रा. वळसंग रोड) यांच्यावर जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. श्रम विसावा लॉज व येथे एजंट मंदार मारुती माने, मॅनेजर आकाश विलास दोडमणी हे पीडित महिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांच्याकडून अवैध वेश्या व्यवसाय करुन घेऊन त्यांच्यापासून मिळणारे उत्पन्नावर आपला उदरनिर्वाह करून कुंटणखाना चालवित होते. जागेचा मालक स्वप्निल नाटेकर याने आपल्या मालकीची जागा अनैतिक व्यापार करण्यास दिली.

 हॉटेल आशीर्वाद पॅलेसचे मालक सतीश गाडगे व मॅनेजर संतोष श्रीकांत संगोजी, रॉयल हिल स्टेशन हॉटेलचे मालक मॅनेजर महांतेश मुकेश सनके हेही पीडित महिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांच्याकडून अवैध वेश्या व्यवसाय करून घेऊन त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर उदरनिर्वाह करून कुंटणखाना चालवत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. जतचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर तपास करत आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here