डफळापूर : जत पंचायत समितीच्या आरोग्य विस्तार अधिकारी आशा शिंदे मॅडम यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त श्री बुवानंद अर्बन परिवारांच्या वतीने सत्कार करण्यात आला.शिंदे यांनी अंकले,डफळापूरसह मिरज तालुक्यात दीर्घकाळ ग्राम आरोग्य सेवेसाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे.१९८६ ला आरोग्य सेविकापासून त्या आरोग्य सेवेत रुजू झाल्या होत्या.आरोग्य सेवेच्या विविध पदावर काम करत गेल्या ३९ वर्ष त्यांनी रुग्णांना प्रामाणिक सेवा दिली आहे.नुकत्याच त्या जत पंचायत समितीच्या आरोग्य विस्तार अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाल्या आहेत.
डफळापूर येथे श्री बुवानंद अर्बन परिवारांच्या वतीने त्यांचा सत्कार करत पुढील आयुष्यास शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी आशा वर्कर्स संघटनेच्या जिल्हाध्यक्ष कॉ.मिनाताई कोळी,एस बँकेचे अधिकारी श्री गणेश सर व बुवानंद अर्बनचे मान्यवर,व कर्मचारी उपस्थित होते.
पंचायत समितीच्या आरोग्य विस्तार अधिकारी आशा शिंदे यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार करण्यात आला.