सांगली : राज्यातील १.३४ लाख युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या कायम नियोजनाच्या मागणीसाठी तुकाराम बाबा महाराज यांनी सांगलीत कृष्णामाई घाटावर आमरण उपोषण सुरू केलं. परवानगी नाकारल्यामुळे रात्री उशिरा उपोषणाचे स्थळ स्टेशन चौकात हलवण्यात आले.
प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतरही भविष्य स्पष्ट न झाल्याने संतप्त प्रशिक्षणार्थी बाबांच्या मागे ठामपणे उभे राहिले आहेत. उपोषण स्थळी राज्यभरातील जिल्हाध्यक्ष आणि हजारो प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
तुकाराम बाबांनी “मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांशीच थेट चर्चा झाली पाहिजे” असा आग्रह धरला असून, मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
मुख्य मागण्या:
- कायमस्वरूपी नियुक्ती
- रुजू दिनांकापासून वयोमर्यादा ग्राह्य धरणे
- ११ महिन्यानंतर काय? याचे उत्तर
- भविष्यकालीन रोजगाराबाबत ठोस धोरण




