जयंत आदाटे यांचे निधन

0
9



जत,संकेत टाइम्स : दैनिक लोकमतचे जत प्रतिनिधी जयंत आदाटे यांचे रविवारी निधन झाले.त्यांच्यावर सांगली येथील खाजगी रुग्णालयात गेल्या 20 दिवसापासून उपचार सुरू होते,रविवारी त्यांची प्राणज्योत मावळली.

साधारणतः 35 वर्षापुर्वी त्यांनी मिरज येथून दैनिक लोकसत्ता या वृत्तमान पत्रातून पत्रकारितेस सुरूवात केली होती.






दरम्यानच्या काळात त्यांनी प्रतिध्वनी या वृत्तपत्रातही काही काळ काम केले.दैनिक लोकमतने सांगली आवृत्ती चालू केल्यापासून ते लोकमतचे जत तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत होते.त्यांनी तालुक्यातील अनेक प्रश्नावर प्रभावी लेखन केले होते.एकाद्या घटनेच्या मुळापर्यत जाऊन वांत्ताकन ते करायचे.






कमी बोलणारे,सर्वात जेष्ठ,पत्रकारांचे‌ मार्गदर्शक म्हणून ते परिचित होते.सर्वकाही व्यवस्थित सुरू असताना त्यांना 20 दिवसापुर्वी सांगलीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.ते प्रकृत्ती सुधारतेय असे वाटत असताना त्यांचे दुर्देवाने रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here