शेतकरी नेते नागनाथ शिळीण यांचा शिवसेनेत प्रवेश

0
5

संखमध्ये पक्षाला बळकटी

संख : संख परिसरातील नामांकित शेतकरी नेते नागनाथ शिळीण यांनी आपल्या शेतकरी संघटनेतील सर्व कार्यकर्त्यांसह आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले.

शेतकरी संघटनेचा मजबूत पाठिंबा मिळाल्याने संख जिल्हा परिषद गटात शिवसेनेची ताकद अधिक वाढल्याचे युवा सेना विधानसभा प्रमुख प्रवीण आवराधी यांनी सांगितले.

नागनाथ शिळीण यांच्या प्रवेश सोहळ्यास शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते,शिवसेना उपतालुकाप्रमुख शशिकांत पाटील,शिवसेना तालुका संघटक रमेश बिरादार,शिवसेना उपतालुका प्रमुख मिलिंद टोने,सोशल मीडिया तालुकाप्रमुख चनंबसू गुजरे,हणमंत बिरदार, मल्लिकार्जुन शिळीण, सांगापा बगली, प्रकाश करांडे, मारुती बंडगर, सुमित चव्हाण, प्रकाश चांभार आदी अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

चौकट

संख शेतकरी संघटनेचा एकमुखी पाठिंबा

नागनाथ शिळीण यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाल्याने पक्षाला ग्रामीण व शेतकरी समाजात मोठी राजकीय बळकटी मिळाली. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये या समर्थ पाठिंब्याचा शिवसेनेला निश्चितच फायदा होईल, असा विश्वासही अवराधी ‌यांनी व्यक्त केला.

फोटोओळी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकरी नेते नागनाथ शिळीण शिवसेनेत प्रवेश केला.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here