पुणे : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या वतीने पुणे विभागातील सातारा, सांगली, सोलापूर, पुणे व कोल्हापूर जिल्ह्यातील संगणक प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी पुणे येथे एकदिवसीय कार्यशाळा सोमवारी दिनांक ०७ एप्रिल २०२५ रोजी पार पडली. एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन स्टेट प्रोजेक्ट हेड राफिया रेशी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पुणे विभाग प्रमुख सुबोध नदेश्वर, टसेंट्रल ऑपेरेशन हेड -सचिन पतडे, जिल्हा व्यवस्थापक व तालुका व्यवस्थापक तसेच इतर विभागातील विभाग प्रमुख उपस्थित होते.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांचे आयसीटी प्रशिक्षक राबविण्यात येत आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक ज्ञान व्हावे, या उद्देशातून समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील विविध माध्यमिक शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा व संगणक प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.त्याची पूर्वतयारी यासंदर्भात संगणक प्रशिक्षकांचे एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.त्यामध्ये कोल्हापुर जिल्हा मधून १३ शाळा/BRC,सोलापूर जिल्हा मधून १४ शाळा/BRC,सांगली जिल्हा मधून ९ शाळा/BRC,सातारा जिल्हा मधून ९ शाळा/BRC, पुणे जिल्हा मधून ३० शाळा/BRC या उपक्रमातून विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करणे, ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या मागे राहू नयेत याची खबरदारी घेणे, शालेय अभ्यासासोबत संगणक व इंटरनेट यांच्या मदतीने शालेय अध्यापन करणे, अशा विविध बाबींबद्दल या एकदिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.
या कार्यशाळेत डिजिटल शिक्षणाच्या नव्या प्रवाहांबाबत, आयसीटी पोर्टल्स यांचा प्रभावी वापर कसा करावा, याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षकांनी आपले अनुभव, अडचणी व यशोगाथा शेअर केल्या. सहभागींमध्ये सर्जनशीलता वाढावी, आणि अध्यापनाचे पातळीवर नवीन प्रयोग राबवता यावेत, हा यामागचा उद्देश होता.
कार्यशाळेचा समारोप करताना राफिया मॅडम यांनी सर्व प्रशिक्षकांचे कौतुक करत, पुढील काळात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक करण्याचे आवाहन केले.
पुणे येथे झालेल्या या एकदिवसीय कार्यशाळेने संगणक प्रशिक्षकांना नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून अध्यापन अधिक परिणामकारक करण्याची दिशा दिली.या प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान आणि कौशल्य आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. कार्यशाळेतील चर्चांमधून प्रशिक्षकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, पुढील काळात ते आपल्या शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाचे प्रभावी उपक्रम राबवण्यास सज्ज आहेत.
या उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील शैक्षणिक दरी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कार्यशाळेचा हा अनुभव प्रशिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरला असून, भविष्यात अशा उपक्रमांची संख्या वाढवावी, अशी मागणीही सहभागी प्रशिक्षकांनी व्यक्त केली.