जत,संकेत टाइम्स : सांगली जिल्ह्यात आता कोरोनानंतर म्युकरमायकोसीस या रोगाची एंट्री झाली आहे.जत तालुक्यातील सोन्याळ येथील अबंव्वा धऱ्याप्पा मुंचडी वय 55 यांचे शनिवार निधन झाले आहे. तालुक्यातील ही पहिलीच दुर्देवी घटना,असून तालुक्यात भिती व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात शनिवारी म्युकरमायकोसीसचे 11 रूग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत म्युकरमायकोसीसचे 72 रूग्ण आढळून आले असून यापैकी सोन्याळच्या या महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.जत तालुक्यातील सोन्याळ येथील अबंव्वा मुचंडी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सहा दिवसापुर्वी जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.उपचार सुरू असताना तिसऱ्या दिवशी त्यांचा एक डोळा निकामी झाला,चौथ्या दिवशी पुन्हा दुसराही डोळा निकामी झाला व शरिर संपुर्ण काळे पडले.
पुढील काही तासात त्यांचा मुत्यू झाला.अशा लक्षणाच्या पहिल्या रुग्णाचा मुत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.यापुर्वी आडपाडीतील एका रुग्णाचा या साथीने मुत्यू झाला होता.जत तालुक्यात कोरोनाचा अगोदरच उद्रेक झाला असताना नव्याने म्युकर मायकोसिसचा आजाराचा फैलाव होत असल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.
या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे.उपचाराचा खर्च महागडा असल्याने सध्या ग्रामीण रुग्णालयात अशा रुग्णावर उपचार सुरू आहेत.भारतीसह काही खाजगी रुग्णालयातही उपचार सुरू आहेत.सध्या 57 पैंकी 5 रुग्ण अत्यावस्थ आहेत.पुढील धोका ओळखून प्रशासनाने औषधे मोठ्या प्रमाणात मागविण्यात आल्याचे सांगण्यात आले.