रेवणसिद्ध व रेवणगाव घाटातील रस्ता दुरुस्ती न झाल्यास रस्ता रोकोचा इशारा

0
10

विजापूर–गुहागर राज्य महामार्गावरील रेवणसिद्ध घाट व रेवणगाव घाटातील रस्त्याची दुरवस्था गंभीर बनली असून, अपघातांचा धोका वाढला आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज विटा येथे प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात स्पष्ट इशारा देण्यात आला असून, सदर रस्त्याचे काम आठवड्याभरात सुरू न झाल्यास २९ डिसेंबर २०२५ रोजी रेवणसिद्ध घाटात रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असे पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले. घाटातील खड्डे, तुटलेली डांबरीकरणाची पट्टी आणि अपुरी साईडपट्टी यामुळे वाहतूक विस्कळीत होत असून, वाहनचालक व प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पंकज दबडे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संदीप ठोंबरे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष दिपाली लांब, शहराध्यक्षा वैशाली विभूते, नंदाताई शिंदे, राज लोखंडे, आबासो जाधव, सोमनाथ जाधव, सामराय तुंबगी, शहर उपाध्यक्ष सुहास कुलकर्णी, अजित चव्हाण, राजकुमार गायकवाड, सुनील साळुंखे, महेश कणसे, गोपाल झेडपे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here