जतमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत, डॉ.रविंद्र आरळी नगराध्यक्ष

0
108

कॉग्रेस ६,राष्ट्रवादी(अ.प.)३,एक अपक्ष विजयी

जत : नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत जतेच्या राजकारणात मोठा बदल घडवत भारतीय जनता पार्टी ने २३ पैकी ११ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या आक्रमक प्रचार मोहिमेचा हा थेट परिणाम मानला जात आहे. सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या मतमोजणीनंतर तीन फेऱ्यांत अंतिम निकाल जाहीर झाला.

या निवडणुकीत काँग्रेस ला ८ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला ३ जागा, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार चिठ्ठीद्वारे विजयी ठरला. एकूण निकाल पाहता भाजपने नगरपरिषदेवर निर्णायक वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

नगराध्यक्षपदी डॉ. रविंद्र आरळी यांचा दणदणीत विजय

नगराध्यक्षपदासाठी एकूण ७ उमेदवार रिंगणात होते. भाजपचे डॉ. रविंद्र आरळी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेत अखेर २,४९६ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला.

नगराध्यक्षपदाचे निकाल (मतसंख्या) :

डॉ. रविंद्र आरळी (भाजप) – ९,११२ मते (विजयी)

सुजय शिंदे (काँग्रेस)- ६,६१६,सुरेश शिंदे (राष्ट्रवादी)-३,४७०,सलीम गवंडी (शिवसेना) -८६४,अर्जुन कुकडे (मार्क्सिस्ट)- ११४,नवनाथ पवार (अपक्ष)-१०६,मल्लिकार्जुन हत्ती (अपक्ष)-६८,नोटा-११४ डॉ.आरळी यांनी पहिल्या फेरीत ८९९, दुसऱ्या फेरीत १,२४७ आणि तिसऱ्या फेरीत ३५० मतांचे मताधिक्य घेत विजय निश्चित केला.

२३ जागांसाठी ९४ उमेदवार; चुरशीच्या लढती

नगरपरिषद निवडणुकीत २३ जागांसाठी तब्बल ९४ उमेदवार रिंगणात उतरले होते. अनेक प्रभागांमध्ये अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या, तर काही ठिकाणी अत्यल्प मतांच्या फरकाने निकाल लागले.

विशेष चर्चेचा विषय ठरला प्रभाग १० अ, येथे अपक्ष उमेदवार फिरोज नदाफ आणि भाजपचे उमेदवार दोघांनाही ४६६ मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे नदाफ यांना विजयी घोषित करण्यात आले. या निकालामुळे मतमोजणी केंद्रात उत्सुकता आणि चर्चेला उधाण आले.

प्रभागनिहाय निकालांतून राजकीय चित्र स्पष्ट

या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळाली. काही प्रभागांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपले पारंपारिक वर्चस्व राखले, तर अनेक प्रभागांत भाजपने संघटनशक्तीच्या जोरावर बाजी मारली.

मतदारांनी पक्षापेक्षा स्थानिक नेतृत्व, कामाचा अनुभव आणि वैयक्तिक प्रतिमा यांना अधिक पसंती दिल्याचे अनेक प्रभागांतील निकालांतून स्पष्ट झाले.

महिला उमेदवारांचा ठसा

या निवडणुकीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महिला उमेदवारांचा लक्षणीय सहभाग आणि विजय. अनेक प्रभागांत महिलांनी पुरुष उमेदवारांवर मात करत मतदारांचा विश्वास संपादन केला.

निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

निकाल जाहीर होताच जत शहरात भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, गुलाल उधळत आणि घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. “हा विजय म्हणजे विकास आणि स्थैर्याला मिळालेली पावती आहे,” अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून देण्यात आली.

जनतेने दिला स्थैर्याचा कौल

एकूण निकाल पाहता, जत शहरातील जनतेने स्थैर्य, विकास आणि सक्षम नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपच्या हाती सत्तेची सूत्रे दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी यांच्या नेतृत्वाखाली जत नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराच्या विकासाला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

प्रभाग १ अ-राजकुमार साळे (भाजप) – ९९३ विजयीयोगेश कांबळे (राष्ट्रवादी) – ७१२महेश साबळे (काँग्रेस)- ८३दिलीप चव्हाण (शिवसेना) – १९नोटा- २४

◆ प्रभाग १ ब-लक्ष्मीबाई आण्णाप्पा कैकाडी (भाजप)- ८६० विजयीमेघा संतोष देवकर (राष्ट्रवादी)- ८५०रंजना गोविंद पवार (काँग्रेस) – १०६नोटा- १५

■ प्रभाग २ अ-प्रमोद हिरवे (भाजप)- ६२६ विजयीमहादेव कोळी (काँग्रेस)- ४९३शरणाप्पा अक्की ( राष्ट्रवादी) १६६श्रावण चौगुले (शिवसेना)-११नोटा- १२

◆प्रभाग २ ब-डॉ. विणा शंकर तंगडी (भाजप)- ६२५ विजयीगौरी प्रशांत पाटील (राष्ट्रवादी)- ३२४शोभा इराण्णा निडोणी (काँग्रेस)- ३४३नोटा-१०

■ प्रभाग ३ अ-सिमा संतोष पट्टणशेट्टी (भाजप)- ७९३ विजयीहेमा शरद चव्हाण (राष्ट्रवादी)- २०७गिताजंली दिनेश जाधव (काँग्रेस)- ७३८सुनंदा विजय चव्हाण (शिवसेना)-८३नोटा-१९

◆ प्रभाग ३ ब-गौतम ऐवाळे (भाजप)- ८७४ विजयीधैर्यशील सावंत (काँग्रेस)-७१५सागर चंपान्नावर (राष्ट्रवादी)- १५८रोहित कांबळे (शिवसेना)- ६८राहुल शिंदे (अपक्ष)- १४नोटा-१३

■ प्रभाग ४ अ-संतोष उर्फ भुपेंद्र कांबळे (काँग्रेस)- ९५२ विजयीसुभाष कांबळे (भाजप)- ५८७संतोष साबळे (बसपा-राष्ट्रवादी)- ३४२प्रमोद सावंत (शिवसेना)- २०८हर्षवर्धन कांबळे (रिपाइं आठवले गट अपक्ष)- १३५नोटा-२०

◆ प्रभाग ४ ब-निलाबाई कृष्णा कोळी (काँग्रेस)- १०९१ विजयीतस्लिम जिलानी जमादार (बसपा-राष्ट्रवादी)- ३८५हेमलता बसवराज चव्हाण (भाजप)- ५३३प्रिती प्रभाकर गायकवाड (शिवसेना)- १४१नजमा अजीज सत्ती (रिपाइं आठवले गट अपक्ष)- १४२नोटा-१२

■ प्रभाग ५ अ-प्रणिता गजानन यादव (भाजप)- ७४९सारिका योगेश ऐडके (राष्ट्रवादी)- ४०५हयातबी कासीम गवंडी (काँग्रेस)- ७६२अश्विनी चंद्रकांत माळी (शिवसेना)- ११५नोटा- २१

◆ प्रभाग ५ ब-इमरान गवंडी (राष्ट्रवादी )-७४४ विजयीयुवराज निकम (काँग्रेस)- ५६३निलेश मटगार (भाजप)- ४९८अरशद गवंडी (शिवसेना)- १२७नोटा-२०

■ प्रभाग ६ अ-संगीता अविनाश सोनूले (भाजप) ९७२ विजयीमनीषा सचिन माने ( काँग्रेस)- ३६६शारदा अरुण कणसे (राष्ट्रवादी)- ५६१दिपाली सुनील देवकुळे (शिवसेना)- ७७नोटा- २९

◆ प्रभाग ६ ब-विक्रम ताड (भाजप)- ८९० विजयी सचिन मदने (राष्ट्रवादी)- २३९ विक्रम ढोणे (रासप-काँग्रेस)- ६९८अनिकेत मोटे (शिवसेना)- ४५राघवेंद्र चौगुले (अपक्ष)- ८७संजय शितोळे (अपक्ष)- ३०नोटा-१६

■ प्रभाग ७ अ-अर्चना बाजी केंगार ( राष्ट्रवादी)- ७०५ विजयीरंजना विलास बाबर (भाजप)- ४०७स्नेहल संतोष हविनाळ (शिवसेना)- १००मनीषा जगदीश साबळे (काँग्रेस)- ३६४नोटा-१३

◆ प्रभाग ७ ब-स्वप्नील शिंदे (राष्ट्रवादी)- ६९५ विजयीप्रवीणकुमार वाघमोडे (भाजप)- ५२५संजय वाघमोडे (काँग्रेस)- २२३नागेश मदने (शिवसेना)- ७१रणवीर कदम (अपक्ष)- ६१नोटा-१४

■ प्रभाग ८ अ-विकास माने (काँग्रेस)- ७६० विजयीरवींद्र मानवर (भाजप)- ६७०हेंमत चौगुले (राष्ट्रवादी )- १७२नवनाथ पवार (अपक्ष)- ०६नोटा-१६

◆ प्रभाग ८ ब-सुप्रिया योगेश बामणे (काँग्रेस)- ७४४ विजयीसुवर्णा दिपक पाटणकर ( राष्ट्रवादी )-१५३शारदा चंद्रकांत कुंभार (भाजप)- ६१९तेजस्विनी बजरंग व्हनमाने (शिवसेना)- ९२नोटा-१६

■ प्रभाग ९ अ-शबाना मिरासाहेब जमखंडी (काँग्रेस)- ६१० विजयीस्वप्ना अशोक स्वामी (भाजप)- ५६९रेश्मा शाहनवाज नदाफ (राष्ट्रवादी)- ४२३नोटा-१९

◆ प्रभाग ९ ब-मोहनभैय्या कुलकर्णी (काँग्रेस)- ६७७ विजयीदीपक उर्फ संतोष मोटे ( भाजप)- ३३६लक्ष्मण एडके (राष्ट्रवादी)- ५८७नोटा- ११

■ प्रभाग १० अ-फिरोज नदाफ (अपक्ष), ४६६ चिठ्ठी विजयीपवन कुंभार (भाजप)- ४६६सलीम नदाफ (काँग्रेस)- ४५७मोहिद्दीन इनामदार (राष्ट्रवादी)- ३८९नोटा-११

◆ प्रभाग १० ब-अनुसया प्रकाश माने ( काँग्रेस) ६७१ विजयीसुवर्णा बाळासो बामणे (राष्ट्रवादी)- ५३८सुप्रिया संतोष बाबर( भाजप)- ३०६संजीवनी दीपक शेटे (शिवसेना)- २६नरगीस समीरअली नदाफ (अपक्ष)- ४७तेजस्विनी श्रीकांत सोनवणे (अपक्ष)- १९५नोटा-०६

■ प्रभाग ११ अ-काजल राहुल काळे (काँग्रेस)- १२३७ विजयीसुप्रिया स्वप्नील कोळी (भाजप)- ११७५प्राजक्ता अनिकेत शिंदे (राष्ट्रवादी)- १६६नोटा- ३३

◆ प्रभाग ११ ब-नंदिनी सोमशेखर मठपती (भाजप)- १२१२ विजयीमीनाक्षी शरणाप्पा अक्की (राष्ट्रवादी)- ४७६तस्लिम सद्दाम अत्तार (काँग्रेस)- ८९२नोटा- ३१

◆ प्रभाग ११ क-मिथुन भिसे (भाजप)- १२०९ विजयीसंग्राम जगताप ( राष्ट्रवादी) – ४०३कुशाल बिज्जर्गी (काँग्रेस)- ८९७भास्कर जाधव (शिवसेना)- ६६नोटा- ३६

गर्दीचा एक फोटो पाठवितो

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here