जत,संकेत टाइम्स : सांगली जिल्ह्यात शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही कोरोना साथ रोग आजाराची दुसरी लाट फैलावत आहे. या आजारावर उपचार करणेसाठी जिल्हा स्तरावरुन विविध उपाय योजना राबविणेत येत आहेत.याचाच एक भाग म्हणून जिल्हयातील ग्रामीण भागातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे येणाऱ्या सर्दी, ताप, श्वसन व फुफ्फुस विषयक आजार व इतर कोविड सदृष्य लक्षणे असणाऱ्या संशयित बाह्यरुग्णांची दैनंदीन माहिती घेणेचे काम जिल्हा परिषदेतील पाणी व स्वच्छता कक्ष व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागातील क्षेत्रीय कर्मचारी यांचेकडून घेतले जात आहे.
ग्रामीण भागातील खाजगी वैद्यकीय डॉक्टरांकडून गुगल लिंकच्या माध्यमातुन बाह्यरुग्णांची माहीती घेतली जात आहे. वैद्यकीय अधिकारी यांचेकडून प्राप्त 1520 खाजगी वैद्यकीय डॉक्टरपैकी आता पर्यंत 600 खाजगी डॉक्टरांनी आपणाकडे येणाऱ्या नविन कोविड सदृष्य, सारी, इन्फलुजा आजारची लक्षणे असणाऱ्या बाहयरुग्णांची माहिती भरण्यास सुरुवात केलेली आहे.प्राप्त झालेल्या बाह्यरुग्णांच्या माहितीच्या आधारे तालुका वैद्यकीय अधिकारी/ मेडीकल
ऑफिसर प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी संशयित रुग्णापर्यंत पोहचून रुग्णांची कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील ज्या खाजगी डॉक्टरांनी जिल्हा प्रशासनास सदर बाह्यरुग्णांची माहिती लपवल्यास अथवा माहिती देणेस टाळाटाळ केलेस व संबधित रुग्णास नजिकच्या आरोग्य संस्थेकडे तपासणी करणे करीता संदर्भात केले नसलेचे निदर्शनास आलेस, अशा रुग्णांचा दुर्दैवी मुत्यू झाल्यास संबंधित डॉक्टर यांचे वर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय साथ रोग अधिनियम 1897 अन्वये कायदेशीर कारवाई होणार आहे.
जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय डॉक्टरांनी दैनंदीन व नियमित माहिती या https://forms.gle/