कोरोना लढाईतील भिवर्गीतील योध्दा कुंटुंब

0
8




जत : कोरोनाच्या जीवघेण्या लढाईत धिरोधत्तपणे अनेक अधिकारी,कर्मचारी,डॉक्टर्स,आरोग्य,महसूल,पोलीस कर्मचारी जीवाची बाजी लावून जनतेच्या जीव वाचविण्यासाठी लढत आहेत.कोरोना लढाईत असे एक जत तालुक्यातील भिवर्गी येथील मल्लेशप्पा मलकप्पा चौगुले या कर्तव्यदक्ष शिक्षकांचे चौगुले कुंटुंबातील सर्व सदस्य जीवाची पर्वा न करता कोरोना विरोधातील लढाईत योध्दा सारखे लढत आहेत.

पहिल्या व दुसऱ्या लाटेत या कुंटुंबातील मलेशप्पा चौगुले यांचे थोरले चिरजिंव प्रकाश चौगुले हे सोलापूर येते राज्य विमा योजना रुग्णालय येथे अदिपरिचरिका म्हणून कोरोना बाधित रुग्णावर उपचार करत प्रभावीपणे कर्तव्य बजावत आहेत.



त्यांच्या पत्नी सौ.भाग्यश्री प्रकाश चौगुले ह्याही ग्रामीण रुग्णालय सटाणा जिल्हा नाशिक येथे अदिपरिचरिका म्हणून कोरोना बाधित रुग्णाची देखभाल करत आहेत.त्यांनी आपल्या एक वर्षाच्या मुलांला घरी सोडून कोरोना महामारीच्या संकटात आपलं कर्तव्य बजावत आहेत.सध्या कोरोनाच्या प्रभावी दोन्ही लाटेत हे दांपत्य जीवांची पर्वा न करता देश सेवा म्हणून कार्य करत आहेत.

मल्लेशप्पा चौगुले यांचे दुसरे चिंरजीव रमेश चौगुले हे पत्रकार म्हणून कोरोना काळात नागरिकांना जागृत्त करण्याबरोबर बाधित रुग्णांना मदत मिळावी,यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.त्याशिवाय कोरोना तपासण्या,लसीकरण याबाबत त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून जनजागृत्ती सुरू ठेवली आहे.




त्यांच्या पत्नी सौ.वैशाली रमेश चौगुले या सांगली पोलीस मुख्यालयात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कोरोना महामारीत कामगिरी बजावत आहेत.

जत तालुक्यातील भिवर्गी सीमावर्ती,कन्नडबाहुल गावातील उच्चशिक्षित कुंटुंब कोरोना काळातही आपआपल्या क्षेत्रात प्रभावी कामगिरी करत एकप्रकारे देश सेवा बजावत असून अशी अनेक कुंटुंबे,कुंटुंबातील सदस्य योध्दा होत करत असलेल्या प्रयत्नामुळे कोरोना महामारी नियत्रंणात आणणे शक्य होत आहे.भिवर्गीतील चौगुले कुंटुंबियाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here