येळवीत ग्रामपंचायतीचे काटेकोर नियोजनाने कोरोनाला ब्रेक

0
10



जत,संकेत टाइम्स : सांगली-सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या जत तालुक्यातील येळवी गावात कोरोनाने डोके वर काढले. कोरोनाने अनेकांना जीव गमवावा लागला तर दररोज आठ ते दहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने गावात भितीचे वातावरण पसरले होते.अशा कठीण प्रसंगावेळी सरपंच विजयकुमार पोरे यांनी गावात कडक पावले उचलत नियोजन आखले.त्याला सर्वांनी साथ दिल्याने तूर्तास कोरोनाला ब्रेक लागला आहे.

येळवीची वाटचाल हॉटस्पॉटकडे सुरू होती. गावात अनेकांना प्राण गमवावे लागले. 




त्याचवेळी येळवी शेजारी असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील भोसे व अन्य गावात कोरोनाचे हजाराहून अधिक रुग्ण होते.या भागातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक, व्यापारी सर्वांची ये-जा येळवीसह परिसरात सुरू झाल्याने आकडा वाढतच जात ही बाब सरपंच विजयकुमार पोरे यांच्या लक्षात 

येताच त्यांनी तहसिल कार्यालय गाठून परिस्थितीची माहिती तहसिलदार सचिन पाटील यांना दिली.त्यांनी तत्काळ येळवीला भेट देत बैठक घेतली व त्या भागातील जिल्हा सीमा सील करण्याचा आदेश दिला. त्यानुसार मंडल अधिकारी काळे, तलाठी नागेश वाघमोडे, पोलीस पाटील वंदना माने, कोतवाल बाळासो चव्हाण यांनी सीमा सील केल्या.त्याचा चांगला परिणाम दिसून आला. 



कोरोनाची साखळी तुटण्यास मोठी मदत झाली. जनता कर्प्यू लागण्या अगोदरच सरपंच पोरे यांनी प्रशासनाला गाव बंद करण्याबाबत सहकार्य करण्याची मागणी केली होती. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सरपंच पोरे यांना उपसरपंच सुनील अंकलगी,दऱ्याप्पा जमदाडे, सचिन माने, ओंकारस्वरूपाचे अध्यक्ष दीपक अंकलगी, सचिव संतोष पाटील,अष्टविनायक ग्रुपचे अध्यक्ष अविनाश पोरे, नितीन पोतदार यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी यांनी सहकार्य केले.येळवी गाव कोरोनामुक्त झाले पाहिजे, यासाठी गावातील व्यापारी, ग्रामस्थ व प्रशासन यांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. कोरोनाला हद्दपार करायचे असेल तर शासनाने दिलेले नियम पाळणे गरजेचे असल्याचे सरपंच विजयकुमार पोरे यांनी सांगितले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here