जत,संकेत टाइम्स : कोविड लाॅकडाऊनच्या काळात वाढत्या महामारीत सांगली जिल्ह्यातील गरीब मोलमजुरी करणारे बचतगटातील महीलांसह सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिकचक्र बिघडल्यामुळे या सर्वांचे कंबरडे मोडले असून फायनान्स कंपनी व बँकेतून घेतलेले कर्ज हप्ते वसुलीला पुढील वर्षभर वसूलीला स्थगिती द्यावी,अशी मागणी सांगली जिल्हा युवा अध्यक्ष बळीराजा शेतकरी संघटना सागर बाळासाहेब चव्हाण यांनी केली आहे.
चव्हाण म्हणाले,केंद्र व राज्य शासनाने या कोविड महामारीच्या संकटातून बाहेर निघण्यासाठी दीड ते दोन महिन्याच्या वर लाॅकडाऊन केल्यामुळे बचत गटातील महीला,शेतमजूर, सर्वसामान्य रोजंदारी वरील मजुर व हातावर असणारे नागरिकांचे दोन महिन्यापासून लागू केलेल्या लाॅकडाऊन च्या काळात हाताला काम नाही त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीच्या घरातील आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बंद झाली आहे.
लॉकडाऊन च्या काळात शासन फक्त ज्यांचे रेशन कार्ड अंत्योदय, बि.पि.एल.प्राधान्य आहेत अशाच व्यक्तिंना गहू आणि तांदूळ देत असेल तरी इतर जीवनावश्यक वस्तूंची असणारी महागाई त्यामुळे कुटुंब चालवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते आहे त्यामुळे सध्याची परिस्थिती भयानक असल्यामुळे त्यावर सर्व सामान्याचे कुटुंब जिवंत राहू शकत नाही.छोटे व्यवसायिक,रिक्षा व टॅक्सी मालक,चालकासह आर्थिक दुर्बल घटकांचे विज बिले माफ करून इतरांना विजबिल भरणा करण्यासाठी जानेवारी 2022 नंतरची मुदत वाढवून देण्यात यावी.त्याशिवाय सर्वाधिक फटका बसलेल्या प्रत्येक व्यवसायिकांना शासनाने मदत करावी,अशी मागणीही चव्हाण यांनी दिली आहे.





