माडग्याळ ग्रामीण रुग्णालयालाही मिळणार रुग्णवाहिका

0
26



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील आरोग्य‌ यंत्रणा सक्षम करण्यासाठी आमदार विक्रमसिंह सांवत यांनी प्रयत्न चालविले आहेत. त्याचाच भाग म्हणून तालुक्यातील जत,माडग्याळ ग्रामीण रुग्णालय सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना अत्याधुनिक सुविधा रुग्णवाहिका असाव्यात यासाठी आ.सांवत प्रयत्नशील आहेत.त्या पार्श्वभूमीवर माडग्याळ ग्रामीण रुग्णालयासाठी विधान परिषद आमदार मोहनशेठ कदम यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम 2021-22 मधून रुग्णवाहिकेस मंजूरी मिळावी यासाठी जिल्हाधिकारी यांना तसे पत्र देण्यात आले आहे.






तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाल्याने आरोग्य यंत्रणा अशा साथीच्या आजारांना तोंड देईल अशी सक्षम असायला हवी,यासाठी आमदार विक्रमसिंह सांवत यांनी प्रयत्न चालविले आहेत.त्यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून याअगोदर जत,माडग्याळ ग्रामीण रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्रांना विविध उपकरणे,साहित्य उपलब्ध करून दिले आहे.



त्याशिवाय डफळापूर, संख प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मंजूर करण्याची मागणीही जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्याकडे केली आहे.त्याचबरोबर आ.मोहनशेठ कदम यांच्या स्थानिक विकास निधीतून माडग्याळ ग्रामीण रुग्णालयाला 17 लाख रुपयाची सुसज्ज, अत्याधुनिक रुग्णवाहिका मिळणार आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here