तिकोंडीत निर्बंध असतानाही उघड्या दुकानांवर दंडात्मक कारवाई

0
4



तिंकोडी,संकेत टाइम्स : तिकोंडी ता.जत येथे कडक निर्बंध असतानाही दुकाने चालू ठेवल्याबद्दल प्रत्येक दुकानदाराकडून 500 प्रमाणे 2000 हजार रूपये दंड वसूल केला.तसेच करेवाडी(तिकोंडी) येथील एक हॉटेल सील केले आहे.

तिकोंडी सह परिसरातील वाड्यावस्त्यावर कोरोनाचा विस्फोट झाला आहे. दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने धोका बळावला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात लावलेली कडक निर्बंधाचे काटेकोर पालन करण्याच्या सुचना दुकानदारांना आपत्ती व्यवस्थापन समितीकडून देण्यात आले आहेत. तरीही या आदेशाचे उल्लंघन करून गावातील विठ्ठल मारूती कोडग,आमसिध्द‌ सिद्राम वडीयार,विनोद सोमनिंग रांचगोंड,पार्वती चनबसू गोब्बी यांची दुकाने उघडी असल्याचे निदर्शनास येताच समितीने प्रत्येकी 500 रूपये प्रमाणे 2000 हजार दंड वसूल केला.यापुढे पुन्हा दुकान उघडल्यास दुकान सील करण्यात येईल,अशा सुचना दिला.त्याचबरोबर करेवाडी येथील एक नियमबाह्य उघडे असलेले हॉटेल आपत्ती व्यवस्थापन समिती व दक्षता समितीने सील केले.



करेवाडी(ति.)येथील उघडे असलेले हॉटेल सील केले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here