जत,संकेत टाइम्स : जत येथे कोविड सेंटर येथे दाखल रुग्णांच्या नातेवाईकांना विक्रम फांऊडेशनच्या वतीने मोफत जेवन वाटप करण्यात आले.यावेळी विक्रम फांऊडेशनचे अध्यक्ष युवराज निकम,नगरसेवक भूपेंद्र कांबळे, निलेश बामणे व पदाधिकारी उपस्थित होते.
तालुक्यात आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकी म्हणून विक्रम फांऊडेशनकडून तालुकाभर कोरोना काळात नागरिकांना उपयुक्त होईल असे उपक्रम राबवले जात आहे.त्यानुसार शहरातील कोविड सेंटर येथे उपचारासाठी सेंटरमध्ये दाखल रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवन वाटप करण्यात आले.
जत येथील कोविड सेंटरमधील रुग्णांच्या नातेवाईकांना जेवनाचे वाटप करण्यात आले.






