डफळापूर येथे‌ सोमवारपासून वार्ड निहाय संशयिताचा सर्व्हे | दिग्विजय चव्हाण यांची माहिती ; अन्टेजन टेस्टही होणार

0
15



डफळापूर,संकेत टाइम्स : जत‌ पश्चिम भागातील कोरोना बाधित वाढणारा आकडा कमी करण्यासाठी पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण हे प्रयत्न करत आहेत. त्यांच्या माध्यमातून डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील पथकाकडून पश्चिम भागातील कुडणूर,शिंगणापूर,जिरग्याळ,मिरवाड,खलाटी,वाषाण,कंठी,अंकले,बेंळूखी येथे कोरोना तपासणी कँम्प आयोजित करून रुग्ण संख्या नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.





त्याला मोठ्या प्रमाणात यश आले आहे.आता डफळापूर येथे केंद्राच्या पथकाकडून वार्ड निहाय कोरोना सदृश लक्षणे आढळणाऱ्या कुंटुबातील नागरिकांच्या अन्टेजन टेस्ट करण्यात येणार,असल्याची माहिती चव्हाण यांनी संकेत टाइम्सशी बोलताना दिली.

चव्हाण म्हणाले,जत पश्चिम भागातील डफळापूरसह आसपासच्या गावात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत.त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र,स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या सहकार्याने प्रयत्न सुरू केले आहेत.





त्या पार्श्वभूमीवर आम्ही काही गावात कोरोना तपासणी कँम्प आयोजित करून रुग्णांच्या तपासण्या वाढविल्या होत्या.त्याला यश आले असून त्या गावातील नवे रुग्ण आढळून येण्याची संख्या कमी झाली आहे. तशाच पध्दतीने डफळापूर येथे वार्डनिहाय सोमवार ता.24 पासून तपासण्या साठी पथके नेमण्यात आले आहेत.ते गावातील वार्ड निहाय संशयित नागरिकांची ऑक्सीजन, तापमान तपासतील त्यात कोरोना सदृश लक्षणे आढळल्यास अन्टेजन टेस्ट करतील.





पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास त्याला लागलीच विलगीकरण करण्यात येईल, यामुळे कोरोना संसर्ग रोकण्यात मदत होईल,ग्रामस्थांनी पथकाला सहकार्य करावे,आपण सामूहित ‌होऊन कोरोना संकट हटवायचे आहे,असेही चव्हाण म्हणाले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here