जत,संकेत टाइम्स : जतचे आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम 2021-22 मधून तालुक्यातील महत्वाच्या डफळापूर, संख या दोन गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मंजूर कराव्यात, अशा मागणीचे पत्र आ.सांवत यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, जत तालुक्यातील संख व डफळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रे परिसरातील नागरिकांचा मोठा आधार आहेत.सध्या संख परिसरातील 17 तर डफळापूर 16 गावातील नागरिकांना या केंद्रातून आरोग्य सुविधा मिळत आहेत.सध्या कोरोना काळात ही दोन्ही केंद्रे प्रभावी कामगिरी करत आहेत.सध्या या दोन्ही केंद्राकडे रुग्णवाहिका नसल्याने अति तातडीच्या रुग्णांना पुढील उपचारासाठी रुग्ण नेहताना मोठ्या अडणींना सामोरे जावे लागत आहे.
शासकीय रुग्णवाहिका नसल्याने खाजगी वाहने घ्यावी लागत आहेत.तेही सध्या कोरोनाच्या भितीने मिळत नाहीत.त्यामुळे रुग्णांना धोका होत आहे.म्हणून या दोन्ही केंद्राना रुग्णवाहिकेची अत्यंत गरज आहे.त्यामुळे आमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2021-22 अतर्गंत रुग्णासाठी आवश्यक रुग्णवाहिका त्वरित मंजूर होऊन मिळाव्यात असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
त्यामुळे या दोन्ही केंद्रांना सुसज्ज रुग्णवाहिका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून यामुळे रुग्णाची मोठी सोय होणार आहे.








