जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात शुक्रवारी कोरोना नवे रुग्ण पुन्हा द्विशतकावर गेले असून 218 रुग्णाची रुग्णाची नोंद झाली आहे.दुसरीकडे तब्बल 266 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने चिंता काही प्रमाणात कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.तालुक्यात शुक्रवारी एकाही रुग्णाची मुत्यू झालेला नाही.
कोरोना रुग्णांची एकूण संख्या 8403 वर पोहचली असून सध्या 1949 रुग्ण उपचाराखाली आहेत.त्यापैंकी 1766 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत.ते कोरोना विस्फोट वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत.सातत्याने वाढणारा कोरोना बाधित रुग्ण वाढीचा आकडा नियंत्रणात आणणे गरजेचे आहे.सध्या ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत.त्यातील प्राथमिक लक्षणे असलेले सर्वाधिक रुग्ण होम आयसोलेशन मध्ये घरीच राहत आहेत.
ते सध्या कोरोना प्रसाराचे बॉम्ब ठरले आहेत.ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण लपविले जात आहेत.त्यामुळे कोरोना बाधित रुग्ण सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसत आहेत. त्यापुढे जात बाधित कुंटुबातील इतर नातेवाईकात त्यांच्या वावर राहतो.त्यामुळे तेही बाधित आढळत आहेत.नातेवाईक इतरत्र फिरतात त्यामुळे ते अन्य कुंटुबात कोरोनाचा संसर्ग वाढवत आहेत.त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण वाढीचा आकडा दररोज वाढत आहे.
हा कोरोना संसर्ग रोकायचा असेलतर बाधित रुग्णाची यादी ग्रामपंचायतीच्या नोटिस बोर्डावर प्रकाशित करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे स्पष्ट होत आहे.होम आयसोलेशन रुग्णासाठी स्वतंत्र राहण्याची सोय संबधित गावातील शाळात करण्यात यावी.ते रुग्ण पुर्ण बरे होईपर्यत विलगीकरणात ठेवावेत तरचं जत तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण रोकणे शक्य होणार आहे.त्याचबरोबर ग्रामीण भागातील खाजगी दवाखान्यातून कोरोना सदृश लक्षणे असणारे रुग्णांची कोरोना तपासणी करण्याच्या सुचना देण्यात याव्यात.
त्यासाठी या खाजगी डॉक्टरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांनी कडक तपासणी कराव्यात,असे काही सामूहिक प्रयत्न तालुक्यातील कोरोना मुक्त करण्यासाठी उपयुक्त ठरतील.
आजचे जत तालुक्यातील नविन पॉझीटिव्ह रुग्ण :- 218 (जत 23 ,आंवढी 1,खलाटी 2,निगडी खु 1,बिळुर 3,अचकनहळ्ळी 11,संख 5,उमदी 4,को-बोबलाद 1, शेगाव 5 ,मुचडी 1,माडग्याळ 5,जा-बोबलाद 4, पाच्छापूर 1,उमराणी 13,उटगी 2,येळवी 1,सोरडी 3,डोर्ली 7,रावळगुडवाडी 1,बसर्गी 6,डफळापूर 13,घोलेश्वर 3,बेवनुर 1,हिवरे 2,कोळेगीरी 1,पांढरेवाडी 1,जालीहाळ बु 7,गुगवाड 12, तिकोडी 2,व्हसपेठ 1,सिध्दनाथ 1,कुंभारी 3,देवनाळ 2,
अमृतवाडी 6,आसगी तुर्क 1,कोसारी 3,बनाळी 1,खोजनवाडी 7,कंठी 3,तिपेहळळी 1,रामपूर 5,मिरवाड 6,मोटेवाडी 1,सिंगनहळळी 2,गोधळेवाडी 3,करेवाडी को 3,बागलवाडी 6,कुडनुर 2,वायफळ 1, एकुंडी 2,येळदरी 3,जालिहा खु 1,शिगणापूर 1,लंवगा 3,करेवाडी ति. 4,हळळी 1, माणिकनाळ 3)










