जत,संकेत टाइम्स : सांगली जिल्हा परिषद कर्मचारी युनियन 4340 च्या सांगली जिल्हा कार्याध्यक्ष पदी जत पंचायत समितीचे आर.डी.कांबळे यांची निवड करण्यात आली.
जत पंचायत समिती येथे या निवडीचे पत्र गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांच्याहस्ते श्री.कांबळे यांना देण्यात आले.
यावेळी सा.गटविकास अधिकारी तुळशीदास संकपाळ,अधिक्षक सौ.सुषमा मदने,प्रशांत हर्षद,श्री.बारापात्रे,तानाजी गवारी,शाखा अभियंता श्री.मोमीन,श्री.वडेर,श्रीमती एल.बी.मिठारी,श्रीमती राजश्री कोळी,शिवा मदभावी,लायाप्पा पुजारी,दिलीप बागल,किशोर जाधव,श्रीमती खांडेकर,मकरंद लवटे,श्री.तवटे आदी उपस्थित होते.
निवडीनंतर श्री.कांबळे म्हणाले,जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मला दिलेली जबाबदारी नुसार काम करून कर्मचाऱ्यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी माझा कायम प्रयत्न राहिल.
जत पंचायत समितीचे राजू कांबळे यांना जि.प.कर्मचारी युनियनच्या जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून निवडीचे पत्र बिडिओ अरविंद धरणगुत्तीकर यांच्याहस्ते देण्यात आहे.