सांगली जिल्ह्यात कठोर निर्बंधाचा फायदा,‘डेली पॉझिटिव्हिटी रेट’ झाला कमी | नवीन कोविड बाधितांची संख्या घटतेय ;आरोग्य यंत्रणेला दिलासा

0
2



जत : जत येथील कोविड रुग्णालयातील साधारण रुग्ण खाटाही फुल झाल्याने आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत होत्या. कुठल्याही कोविडबाधिताचा उपचाराअभावी मृत्यू होऊ नये यासाठीची तयारी तसेच झपाट्याने वाढत असलेल्या कोविड संसर्गाला ब्रेक लावण्याच्या हेतूने जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यात सुरुवातीला दहा दिवस कठोर निर्बंध लागू केले; पण या दहा दिवसांत पाहिजे तसे यश न आल्याने कठोर निर्बंध 17 मे पर्यत वाढविण्यात आले.मात्र याचा परिणाम कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला नसला तरी 30 टक्‍क्‍यांपर्यंत स्थिर झाला. हा पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा जास्त असून त्यामध्ये घट करण्याच्या दृष्टीने 

दिनांक 19 मे सकाळी 7 वाजल्या पासून 26 मे सकाळी 7 वाजेपर्यंत जारी करण्यात आली आहे.







एप्रिल महिना उजाडताच जिल्ह्याच्या ‘डेली पॉझिटिव्हिटी रेट’ तब्बल 40 टक्क्यांवर गेल्याचे लक्षात येताच कठोर निर्बंध लागू केले. याच कठोर निर्बंधांच्या काळात केवळ आरोग्यविषयक कामासाठी नागरिक घराबाहेर पडल्याने कोविड विषाणूच्या संसर्गाला ब्रेक लावण्यात तालुका प्रशासनाला बऱ्यापैकी यश आल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. 

बुधवारी 151 व्यक्तींचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला असून बुधवारी डेली पॉझिटिव्हिटी दर उतरल्याचे सांगण्यात आले.

नवीन कोविडबाधित सापडण्याची गती वाढल्याने तालुका प्रशासनासह आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या अडचणीत भर पडली होती. इतकेच नव्हे तर जत,

माडग्याळ येथील कोविड रुग्णालयातील साधारण रुग्ण खाटाही फुल झाल्याने आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत होत्या.




कुठल्याही कोविडबाधिताचा उपचाराअभावी मृत्यू होऊ नये यासाठीची तयारी तसेच झपाट्याने वाढत असलेल्या कोविड संसर्गाला ब्रेक लावण्याच्या हेतूने कठोर निर्बंध लागू केले; पण या दिवसांत पाहिजे तसे यश न आल्याने कठोर निर्बंधांच्या काळात 26 मे सकाळी 7 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. शहरी व ग्रामीण भागात कठोर निर्बंधांच्या नियमावलीचे नागरिकांकडून स्वयंस्फूर्तीने पालन झाल्याने मे महिन्याच्या पहिल्या सात दिवसांत पोहोचलेला डेली पॉझिटिव्हीटी दर कमी झाला आहे. तशी नोंदही आरोग्य विभागाने घेतली असल्याचे सांगण्यात आले.

 



जतेत तिसऱ्या लाटेसाठीच्या उपाययोजना कागदावरच?

– कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जत तालुक्यातील आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना सळो की पळो करून सोडले. शिवाय जिल्ह्यात लिक्विड ऑक्सिजन तसेच  विविध औषध तुटवड्याच्या झळा सोसाव्या लागल्या. या  विदारक परिस्थितीला आरोग्य यंत्रणेतील अधिकारी तोंड देत असतानाच तज्ज्ञांकडून कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. असे असले तरी अद्याप

तयारी दिसत नाही, त्यामुळे तिसऱ्या लाटेसाठीच्या उपाययोजना कागदावरच काय, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here