जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील तोळबंळवाडी(मुंचडी)येथील मित्राच्या खून प्रकरणातील संशयित रमेश फकिराप्पा पाटोळे रा.तोळबंळवाडी(मुंचडी) याला गावातील ऊसाच्या शेतातून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरंबद केले.
त्यांने तीस रुपये मागितलेचे कारणावरून गळा आवळून मित्र अरूण शामू मलमे वय 20,रा.तोळबळवाडी(मुंचडी)
यांचा खून केल्याची कबूली पोलीसांना दिली आहे.
अधिक माहिती अशी, तोळबंळवाडी येथील कन्नड शाळेजवळ रमेश पाटोळे यांनी त्यांचा मित्र असलेल्या अरूण मलमे यांने तीस रुपये मागितल्याच्या कारणावरून गळा आवळत लाथाबुक्यांनी गंभीर मारहाण करून खून केला होता.घटना मंगळवारी सायकांळी सात वाजण्याच्या सुमारास घडली होती.
याप्रकरणी मयतचे वडील शामू गुंडू मलमे यांनी जत पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला होता.तेव्हा पासून संशयित रमेश पाटोळे फरारी होता.गुरूवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक त्यांचा शोध घेत असता पथकातील राजू शिरोळकर यांना रमेश पाटोळे गावातील ऊसाच्या शेतात लपून बसल्याचे त्याचे खास बातमीदाराकडून समजले वरून पथकाने ऊसाच्या शेतात छापा टाकत त्याला शिताफीने ताब्यात घेतले.त्याला पोलीसांनी खूनाबाबत विचारले असता त्याने खून केल्याची कबूली दिली आहे.
पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सर्जेराव गायकवाड,सा.पो.नि.रविराज फडणवीस, राजू शिरोळकर,जितेंद्र जाधव,राजू मुळे,आमसिध्दा खोत यांच्या पथकाने कारवाई केली.