जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात पांढरेवाडी येथील बोर नदी पात्रता वाळू तस्करी करत असलेली दोन ट्रँक्टर महसूलच्या पथकाने जप्त केली.गुरूवारी पहाटे ही संख अप्पर तहसील कार्यालया पथकाने ही कारवाई केली.
जत पुर्व भागातील बोर नदी पात्रात लॉकडाऊनचा फायदा घेत मोठा फायदा घेत राजरोसपणे वाळू तस्करी सुरू आहे
त्या पार्श्वभूमीवर अप्पर तहसील यांचे पथक पुन्हा कार्यरत करण्यात आले आहे. पथकाला गुरूवारी पहाटे पांढरेवाडी नजिकच्या ओढात वाळू काढत असलेली निवा नंबरची एक लाल व एक निळा असे दोन ट्रँक्टर आढळून आले आहेत. जप्त केलेल्या ट्रँक्टरवर दंड प्रस्तावित करण्यात आला आहे.