जत तालुक्यात कोरोना मुक्त संख्या नव्याच्या दुप्पट,‌तिघाचे मुत्यू

0
10



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात गुरूवार ता.20 ला 135 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. गुरूवारी बाधित रुग्ण संख्या दीडशेच्या खाली आहे.दुसरीकडे 277 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने नव्याच्या दुप्पट बरे होणारे रुग्ण असल्याने दिलासा मिळाला आहे.दुर्देव्याने गुरूवारी आणखीन तीन रुग्णाचा मुत्यू झाला आहे.

तालुक्यात गेल्या दोन आठवड्यात कोरोना विस्फोट झाला होता.मात्र गत सोमवार पासून कोरोनाचा प्रभाव उतरणीला लागल्याचे चित्र आहे.






तालुक्यात सध्या 1976 रुग्ण उपचाराखाली असून त्यापैंकी 1788 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत.तालुक्यातील कोरोना बरे होणारी टक्केवारी 72 टक्के आहे.तालुक्यातील एकूण बाधित संख्या 8050 वर पोहचली आहे.सध्या तालुक्यात तीन शासकीय, दोन खाजगी कोरोना हॉस्पिटल सुरू आहेत.त्यामुळे बेड शिल्लक नाहीत,ऑक्सीजन नाही अशी उत्तरे कमी झाले आहेत.






गुरूवारी तालुक्यात आढळून आलेले रुग्ण ; जत‌ 18,वाळेखिंडी ‌2,खलाटी 5,निगडी खु.3,बिळूर 5,मेंढेगिरी 2,संख 2,उमदी 5,गुलगुजनाळ 2,धावडवाडी 1,को.बोबलाद 3,वळसंग 5,शेगाव 2 तिल्याळ 2,माडग्याळ 10,जाडरबोबलाद 19,पाच्छापूर 2,उमराणी 9,उटगी 6,सोन्याळ 2,रावळगुडेवाडी 6,बसर्गी 1,डफळापूर 4,घोलेश्वर 1,बेवनूर 1,कोळीगिरी 1,जाल्याळ बु.2,तिकोंडी 2,बेंळूखी 1,व्हसपेठ 2,सिध्दनाथ 1,भिवर्गी 4, अमृत्तवाडी 1, 






कोसारी 5,बनाळी 5,खोजानवाडी 2,कंठी 1,गुड्डापूर 1,रामपूर 4,बागेवाडी 2,सिंदूर 1,मिरवाड 4,कुणीकोणूर 1,अंतराळ 2,सिंगनहळ्ळी 2, दरिबडची 1, करेवाडी ति. 1,बागलवाडी 1,एकूंडी 1,लकडेवाडी 1,प्रतापपूर 1,येळदरी 1,मोकाशवाडी 2,करजगी 2,जालिहाळ खु.5

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here