पेट्रोल, डिझेल, खते दरवाढीविरोधात जतेत राष्ट्रवादीचे आंदोलन

0
3





जत,संकेत टाइम्स : केंद्र सरकारच्या धोरणांमुळे पेट्रोल,डिझेल गँस सिलेंडर तसेच खत दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांना वेठीस धरले गेले आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंंगळवारी 

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोजक्याच कार्यकर्त्याच्या उपस्थितीत केंद्र सरकारचा निषेध केला.निषेधाचे निवेदन प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांना दिले.






भारतात पेट्रोल व डिझेलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेलेले आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दुसरा धक्का दिला आहे, त्यामुळे देशातील शेतकरी आधीच अडचणीत असताना खताची दरवाढ करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खताच्या किमती भरमसाठ वाढविण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे.10-26-26 खताची किंमत 700 रुपयांनी वाढले आहे. डीएपीची किंमत जवळपास 715 रुपयांनी वाढली आहे. डीएपी 1 हजार 195 रुपयांना मिळायचा, तोच आता एक हजार 900 रुपयांना जाऊन पोहोचला आहे.





10-26-26 चे 50 किलोचे पोते 1175 रुपयाची होते ते आता 1775 रुपयांना मिळत आहे. या सोबतच पोटॅशियमचे किमती वाढल्या आहेत. देशातल्या खतांच्या किमती वाढवण्याचे काम सरकारने केले तरी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दरवाढीचा निषेध करीत आहोत, केंद्र सरकारने ताबडतोब खताची केलेली दरवाढ मागे घ्यावी व सर्वसामान्य शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच या दरवाढीविरोधात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.





सुरेशराव शिंदे म्हणाले,केंद्र शासन कोरोनाच्या काळात अडचणीत असलेल्या शेतकऱ्यावर डिजेल,पेट्रोल खतांचे दर वाढवून अडचणीत आणत आहे.सध्या कोणत्याही शेतमालाला दर नाही,तरीही खर्चाचा बोजा पडत असून तात्काळ दरवाढ मागे घ्यावी.





रमेश पाटील म्हणाले, कोरोना लॉकडाऊनमुळे सर्व सामान्य,मजूर,व्यापारी,शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत.त्यांना मदतीची गरज असताना केंद्र शासनाने डिजेल,पेट्रोल,गँस सिलेंडर, शेतकऱ्यांना

 लागणाऱ्यांचे दर वाढविले आहेत.ते तातडीने कमी करून सामान्य जनतेसह शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

या आंदोलनात राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते सुरेशराव शिंदे, तालुकाध्यक्ष रमेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अँड.चन्नाप्पा होर्तीकर,माजी सभापती शिवाजी शिंदे,सिध्दू शिरसाड,फिरोज मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.






जत‌ येथे खते,पेट्रोल,डिजेल दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here