जत,संकेत टाइम्स : जत येथिल मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहात सत्तर ऑक्सीजन बेडचे कोविड सेंटर उभारणीचे काम जोरात सुरू असून आज या कामाची पहाणी उपविभागीय अधिकारी श्री.प्रशांत आवटे व तहसिलदार श्री. सचिन पाटील यांनी केली.जत येथिल मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहात जिल्हयाचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सत्तर ऑक्सीजन बेडचे कोविड सेंटर उभारणीचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.जत तालुक्यात सद्या कोरोनाचे पाॅझीटीव्ह रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.
तालुक्यातील बिळूर, जत शहर,शेगाव,माडग्याळ, डफळापुर, उमराणीसह अनेक गावे कोरोनाचे हाॅटस्पाॅट झाली आहेत. त्याच प्रमाणे कोरोनामुळे मृत्यु होणारे रूग्णांचे प्रमाण ही दिवसेंदिवस वाढतच आहे.सद्या जत तालुक्यातील उमदी, माडग्याळ, डफळापुर या ठिकाणी कोविड सेंटर उभारले आहेत.त्याचप्रमाणे या पुढे कोरोनाचे रूग्णांवर त्वरीत उपचार व्हावेत.कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांना ऑक्सीजन ची कमतरता भासू नये यासाठी येथील समाजकल्याण विभागाच्या मुलींच्या शासकिय वस्तीगृहात सत्तर बेडची क्षमता असणारे ऑक्सीजन बेडची उभारणीचे काम जोरात सुरू झाले आहे.या ठिकाणी बेड बसविणे, ऑक्सीजनची पाईपलाईन टाकणे,रूग्णांसाठी बाथरूम,टाॅयलेट तसेच पिण्याचे पाणी या सुविधा तयार करण्याचे काम सुरू आहे.
ऑक्सीजन सिलेंडर ठेवण्यात येणारे जागेचीही पहाणी आज उपविभागीय अधिकारी श्री. प्रशांत आवटे व तहसिलदार श्री. सचिन पाटील यानी केली.या परिसरातील जो विद्युत पुरवठा बंद आहे,तो सुरू करण्याचे काम ही सुरू असून गेलेले वायरिंग,बल्बही बसविण्यात येत आहेत.
जत तालुक्यातील दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या कोरोना रूग्णांसाठी तालुक्यात कोविड सेंटर सुरू होत असली तर या कोविड सेंटर मध्ये काम करण्यासाठी प्रशिक्षीत आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची कमतरता जाणवत आहे.यासाठी प्रशासनाने आरोग्य विभागातील सर्व रिक्तपदे ताबडतोब भरली पाहीजेत व जास्तीत जास्त आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत.जतचे आ.विक्रमसिंह सावंत यांनी ही या नव्याने उभारणी होत असलेल्या
कोविड रूग्णालयात कोविड रूग्णांना कोणत्याही प्रकारे गैरसोयीचा सामना करावा लागू नये याकडे वैयक्तीक लक्ष देत आहेत.यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी पोलीस प्रशासन व जत नगरपरिषद यांना कोविड सेंटर मध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच हा परिसर कायमस्वरूपी स्वच्छ कसा राहील याकडे लक्ष देण्याच्या सुचना सबंधितांना दिल्या. व सत्तर ऑक्सीजन बेडचे हे कोविड सेंटर उभारणीचे चे काम अंतीम टप्प्यात आले असून दोन तीन दिवसात हे कोविड सेंटर, कोविड रूग्णांसाठी सुरू करण्यात येत असल्याची माहिती ही उपविभागीय अधिकारी श्री. प्रशांत आवटे यानी दिली.यावेळी तहसिलदार
सचिन पाटील ,मंडल अधिकारी
संदीप मोरे व पोलीस अधिकारी उपस्थित होते .
जत येथे नव्याने होत असलेल्या कोविड सेंटरच्या कामाची पाहणी प्रांताधिकारी प्रंशात आवटे व तहसीलदार सचिन पाटील यांनी केली.