जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या कमी होतानाचे चित्र आहे.गेल्या दोन दिवसापासून तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्या कमी झाली आहे.मंगळवारी पुन्हा नवे रुग्ण संख्या कमी होत 151 आढळून आली.तालुक्यातील कोरोना मुक्त संख्याही वाढली असून मंगळवारी 225 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहे.मात्र दुसरीकडे पुन्हा 4 जणांचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे.
तालुक्यातील जत शहर,बिळूर,माडग्याळ, डफळापूर, कुडणूर,कुंभारी,उटगी,सनमडी गावांची चिंता कायम असून मंगळवारी येथे पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. मास्क,सोशल,डिस्टसिंग, लसीकरण जत तालुक्याला कोरोना विळख्यातून बाहेर काढू शकतो,अशी सध्याची स्थिती आहे,त्यामुळे प्रशासनाचे नियम नागरिकांनी काटेकोर पाळण्याची नितांत गरज आहे.
मंगळवारचे जत तालुक्यातील नविन पॉझीटिव्ह रुग्ण 151; (जत 17, खलाटी 10, निगडी खु 1, बिळुर 7, अचकनहळळी 4,संख 1, उमदी 3, वळसंग 2, शेगाव 1,माडग्याळ 6, जा.बोबलाद 3, सनमडी 9, पाच्छापूर 1, उमराणी 1, लोहगाव 1,गुळवंची 1, उटगी 6, सोन्याळ 3,येळवी 1,दरिकोणूर 1,डफळापूर 7, घोलेश्वर 2, बेवणूर 1, हिवरे 2, कोळगिरी 1,तिकोंडी 2, बेंळुखी 4, व्हसपेठ 1, टोणेवाडी 1, भिवर्गी 4,कुंभारी 7, देवनाळ 2, अमृतवाडी 1,कोसारी 2, रेवनाळ 1, जिरग्याळ 3,
उंटवाडी 1,बागेवाडी 1, सिंदुर 1, मोटेवाडी 1,शिंगनहळळी 2, बिरनाळ 1, करेवाडी को 3, कुडणूर 5, वायफळ 1, लकडेवाडी 1, बोर्गी बु 1,प्रतापुर 2, येळदरी 1, निगडी बु 1, शिंगणापूर 4, लवंगा 1, सोनलगी 1,तिकोंडी क 1,आक्कळवाडी 1, बोर्गी खु 1असे एकूण 151 रुग्ण आढळून आले आहेत.