प्रतिकात्मक
जत,संकेत टाइम्स : जत येथे कोरोना काळात गेल्या तीन महिन्यापासून जत कार्यरत असलेल्या आदित्य डायग्नोस्टिक(सिटी स्कँन) सेंटर मध्ये नवे मशीन दाखल झाले आहे.या मशीनमुळे एचआरसीटी सारख्या टेस्ट लवकरात लवकर करणे शक्य झाले आहे.
जत शहरातील सातारा रोडला सवदे टॉवर नजिक असणाऱ्या आदित्य डायग्नोस्टिक सेंटर तालुक्यातील रुग्णांना वरदान ठरले आहे.कोरोना दुसऱ्या कोरोना लाटेत गेल्या तीन महिन्यात या सेंटरमधून तब्बल 2,000 रुग्णांची स्कनिग करण्यात आल्या आहेत.यापुर्वी सांगली येथून अशा स्कनिंग व एचआरटीसी सारख्या टेस्ट कराव्या लागत होत्या.
मात्र आदित्य डायग्नोस्टिक मुळे जत शहरात ह्या सोयी उपलब्ध झाल्या आहेत.येथे नव्याने फास्ट स्कँन करणारे नवीन मशीन कार्यरत झाले आहे.त्यामुळे चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आहे.त्याशिवाय येथे सर्व प्रकारचे स्कँनिग शासकीय दरात करण्यात येत आहे.तालुक्यातील रुग्णांनी यांचा लाभ द्यावा असे आवाहन डॉ.संतोष कुलगोंड यांनी केले आहे.
24 तास 7 दिवस सुरू
जत येथे सुरू असणारे आदित्य डायग्नोस्टिक सेंटर दररोज 24 तास आठवड्यातील 7 दिवस सुरू असते.रात्री,मध्यरात्री,कधीही येथे स्कँनीगसाठी प्रशिक्षित कर्मचारी उपस्थित असतात.







