करजगी,संकेत टाइम्स : करजगी ग्रामपंचायती कडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क व सँनीटायझर वाटप करण़्यात आले. गेल्या दोन महिन्यापासून वेशीवर कोरोनाला रोकलेल्या करजगीत दोन दिवसापुर्वी दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे प्रादुभाव रोखण्यासाठी शनिवारी ग्रामपंचायतीने उपाय योजना राबविल्या.
गावात कडकडीत बंद,मास्क,सँनिटायझरचे वाटप करून जनजागृत्ती करत कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
सरपंच साहेबपाशा बिराजदार म्हणाले की, गावात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.आतापर्यत आपण कोरोनाला रोकण्यात यशस्वी झालो आहोत.यापुढेही काळजी घ्यावी,मास्क,सोशल डिस्टसिंग, सँनिटायझरचा वापर करावा.विनाकारण घराबाहेर फिरू नये. उपसरपंच साबू बालगाव,ग्रामसेवक वसंत वाघमोडे,आशा वर्कर, पोलीस पाटील राजू तेली लिपिक सायबणा डुमणे शिपाई बसप्पा हळके सर्व उपस्थित होते.
करजगी ता.जत येथे मास्क,सँनिटायझरचे वाटप करण्यात आले.







