विलास संकपाळ यांचे निधन

0
7



डफळापूर, संकेत टाइम्स : डफळापूर ता.जत येथील ग्रा.प.माजी सदस्य विलास यमाजी संकपाळ यांचे आकस्मिक निधन झाले.त्यावर गेल्या आठ दिवसापासून सांगलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

डफळापूर ग्रामपंचायतीच्या माजी संरपच पमाताई संकपाळ यांचे ते पती होत.





डफळापूरच्या विकास कामात अगदी काटेकोर नियोजन, स्वच्छ,पारदर्शी विचाराचे व्यक्तीमहत्व म्हणून विलास संकपाळ यांची ओळख होती.त्यांच्या पत्नी ग्रामपंचायतीच्या‌ संरपच असतानाच्या काळात त्यांनी प्रभावी काम करत अनेक निर्णय घेतले होते.पेयजल पाणी योजना त्यांच्या काळात आकारास आली होती.योजनेच्या मंजूरीपासून आजपर्यत त्यांचे मोठे योगदान होते.स्व.सुनिलबापू चव्हाण, माजी सभापती मन्सूर खतीब यांच्या बरोबर त्यांनी काम केले होते.फोटोग्राफी व्यवसाय करत त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना उच्चशिक्षित बनविले होते.अगदी सर्व काही व्यवस्थित सुरू असताना त्याचे निधन मनाला चटका लावून गेले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here