जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या देवनाळ कालव्यातून अखेर देवनाळ परिसरात पाणी दाखल झाले.अनेक तपापासून आस लावून बसलेल्या या भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आंनदाश्रू बरचं काही सांगून गेले.
जतच्या दक्षिण भागातील बिळूरनंतर देवनाळ येथे म्हैसाळचे चार टप्पे पुर्ण करून पाणी दाखल झाले आहे.
खलाटी पंपहाऊस मधून कँनॉल, बंधिस्त पाईपलाईद्वारे थेट देवनाळ हद्दीत अखेर पाणी दाखल झाले आहे. ही योजना सुरू झाल्यापासून जतचे भूमिपुत्र असलेल्या देवनाळ सह जत तालुक्यात पाणी यावे यासाठी लढणारे शिवसेना नेते आप्पासाहेब काटकर यांचे स्वप्न पुर्ण झाल्याचे शंभूराज काटकर यांनी सांगितले.
दरम्यान या पाण्याचे पुजन आमदार विक्रमसिंह सांवत, शिवसेनेचे युवा नेते शंभूराज काटकर यांच्याहस्ते झाले.
यावेळी बंटी दुधाळ,शिवाजी पडोळकर,सचिन मदने, संरपच ज्ञानदेव दुधाळ,उपसंरपच राजू कुंभार,किशोर दुधाळ,अमोल देवकते,संतोष दुधाळ,योगेश बामणे आदी मान्यवर उपस्थित होते.
आ.सांवत म्हणाले, मी विधानसभा निवडणूक पुर्व तालुक्यातील प्रत्येक भाग ओलिताखाली आणण्याचे माझ्या शेतकऱ्यांचे स्वप्न साकार झाले आहे. म्हैसाळ सिंचन योजनेतून पाणी जत तालुक्यातील शेवटच्या चोकापर्यत नेहून तालुक्यात हरितक्रांती आणू
देवनाळ ता.जत येथे आलेल्या पाण्याचे पुजन करताना आमदार विक्रमसिंह सांवत, शंभूराज काटकर






