जत,संकेत टाइम्स : सोर्डी ता.जत येथील भारतीय सैन्य दलातील पँरो कंमाडो जवान सचिन नामदेव चाबरे(वय 26)यांचे ह्रदयविकाराने निधन झाले.
सोरडीतील तरूण जवान सचिन चाबरे यांनी प्रतिकूल परिस्थिती शिक्षण घेत ही नोकरी मिळवली होती.
सध्या सचिन हे जम्मू काश्मीर येथे कार्यरत होते.ते सकाळी पेरडला जाण्यासाठी तयार होत असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला त्याचा मुत्यू झाला.
सचिन यांचे बेळगांव ता.जत येथे सेन्यदलाचे प्रशिक्षण झाले होते.त्यांना जम्मू-काश्मीर येथे नेमणूक करण्यात आली.दरम्यान सचिन यांचे एक वर्षापुर्वी लग्न झाले आहे.त्याच्या पश्चात पत्नी, आई,वडील,भाऊ असा परिवार आहे. पार्थिव जम्मू काश्मीर येथून शुक्रवारी सोरडीत येण्याची शक्यता आहे.
दरम्यान गावात हळहळ व्यक्त होत आहे.





