जत‌ तालुक्यात सोमवारी पुन्हा रुग्ण वाढले,मुत्यू संख्येमुळे चिंता वाढली

0
12



जत,संकेत टाइम्स : जत‌ तालुक्यात सोमवारी 196 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर तब्बल 253 जण कोरोना मुक्त झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.तर पुन्हा पाच जणांचा मुत्यू झाला आहे.सध्या तालुक्यातील 157 जणांचा कोरोनामुळे दुर्देवी मुत्यू झाला आहे. सध्या तालुक्यात 2070 रुग्णावर उपचार सुरू आहेत.




 त्यापैंकी 1902 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत. जत शहर,वाळेखिंडी, बिळूर,अचनहळ्ळी,संख,उमदी,सोन्याळ,बेवनूर,जाल्याळ बु.5,बनाळी,खोजानवाडी,

आसंगी जत येथे‌ पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली असून प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करणे गरजेचे बनले आहे. बेपर्वाहीमुळे नाहक नागरिकांना धोका होत आहे.





जत 24, वाळेखिंडी 6,आंवढी 1,निगडी खु 1, बिळूर 9, मेढेंगिरी 2,अचकनहळळी 15, संख 9, उमदी 9, धावडवाडी 1,वळसंग 1, शेगाव 1, मुंचडी 1, माडग्याळ 3, जाबोबलाद 4,उमराणी 4, अंकलगी 3,लोहगाव 1, गुळवंची 1, उटगी 1,सोन्याळ 6, येळवी 1, दरिकोणूर 1,रावळगुंडेवाडी 3, बसर्गी 1, उफळापूर 3, घोलेश्वर 1, बेवणूर 7, कोळगिरी 2, पांढरेवाडी 1, जाल्याळ बु. 5,तिकोंडी 1, बेळंखी 1, 






व्हसपेठ 3,सिध्दनाथ 1, टोणेवाडी 1, भिवर्गी 2,कुंभारी 1,कोसारी 1, बनाळी 11,खोजानवाडी 5, आसंगी जत 6, बागेवाडी 1,सिंदुर 1, मिरवाड 1, अंतराळ 3, मोटेवाडी 1, शिंगनहळळी 3, गोंधळेवाडी 2, दरिबडची 1,करेवाडी को 6, बागलबाडी 2, वायफळ 2,लकडेवाडी 1, प्रतापुर 2, येळदरी 2, निगडी बु 1, लवंगा 1,लमाणतांडा द ब 1, करेवाडी ति 2 येथे नवे पॉझिटिव्ह रुग्ण चिंता वाढविणारे आहेत.






राज्यात‌ एकीकडे रुग्ण संख्या कमी येत असताना जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कमी होत‌ाना दिसत नाही.काही नागरिकांची बेपर्वाही धोका वाढवत आहे.आता आपणच आपल्यासह कुंटुबियांची काळजी घेण्याची गरज आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here