जतेतील विस्तारित 70 ऑक्सीजन बेडचे शासकीय कोविड सेंटर दोन दिवसात सुरू होणार ; प्रांताधिकारी

0
5



जत,संकेत टाइम्स : जत शहरात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार सुरू होत असलेले विस्तारित शासकीय कोविड सेंटर दोन दिवसात सुरू होणार असल्याची माहिती प्रांताधिकारी प्रंशात आवटे यानी दिली.






तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने कोरोना बाधित संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.या रुग्णांना वेळेत उपचार मिळत नव्हता.खाजगी कोविड हॉस्पिटलचा खर्च परवडत नसल्याने व जत,माडग्याळ येथील शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याने मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आजार अंगावर काढत असल्याने मुत्यूची संख्या वाढली होती.तालुक्यात दररोज सात-आठ रुग्णाचा मुत्यू लोकप्रतिनिधी, यंत्रणेला हेलावून टाकत होता.






या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या सुचनेवरून भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल पवार,सभापती मनोज जगताप यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री जयंत पाटील यांना वस्तुस्थिती सांगत‌ जत‌ येथे आणखीन 100 बेडचे शासकीय कोविड सेंटर सुरू करण्याची मागणीचे निवेदन दिले होते.







कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयंत पाटील यांनी तात्काळ जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.डुडी यांना सुचना देत‌ जत येथे विस्तारित नवे कोविड सेंटर सुरू करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार जत येथील समाज कल्याण विभागाचे‌ मुलीचे वस्तीगृह असलेल्या इमारतीत हे प्रांरभी 70 ऑक्सीजन युक्त बेड व पाच,व्हेटिलेटर,प्रशिक्षित डॉक्टर्स,नर्सेस, औषधे उपलब्ध असणारे कोविड सेंटरचे काम पुर्ण होत आले आहे.सध्या ऑक्सीजन पाईपलाईन,ड्युरो सिलेंडर,किरकोळ दुरूस्तीचे‌ काम अतिंम टप्यात सुरू आहे.त्यामुळे मंगळवार,बुधवार पर्यत हे सेंटर कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

या कोविड सेंटर येथे आज राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष पवार,व पदाधिकारी यांनी पाहणी केली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here