सांगली : सांगली जिल्ह्यात रविवारी 1077 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर 1793 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.43 जणांचा दुर्देवाने मुत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव थोडा कमी होत असल्याचे समाधान कारक चित्र रविवारी स्पष्ट झाले.
जिल्ह्यातील आटपाडी 98,कडेगाव 50,खानापूर 70,पलूस 33,तासगाव 181,सांगली महापालिका 165,जत 118,कवटेमहांकाळ 38,मिरज 150,शिराळा 43,वाळवा 131 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत.






