जत तालुक्यात नव्यापेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली

0
20



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात रवीवारी कोरोना रुग्णाची संख्या कमी झाली आहे. तालुक्यात विविध प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालयात  करण्यात आलेल्या तपासणीत जत शहरासह 50 गावात 139 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यातील कोरोनाचा चढता आलेख किमान रविवारी तर खाली आल्याचे‌ दिसत आहे.कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णाची नव्या रुग्णापेक्षा जास्त झाली असून तब्बल 223 जण कोरोना मुक्त झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.तालुक्यात सध्या 2132 जण उपचाराखाली आहेत.






त्यापैंकी 1962 जण होम आयसोलेशन मध्ये आहेत. तालुक्यात कोरोनाचा ग्राफ रविवारी खाली आला आहे. जत शहर,तिकोंडी,भिवर्गी,खोजानवाडी,बागेवाडी,दरिबडची,करेवाडी को.येथे पाचपेक्षा जादा रुग्ण आढळून आल्याने तेथील चिंता वाढली आहे.जत 24, खलाटी 1, निगडी खु 1,बिळुर 3,अचकनहळळी 1, संख 2, उमदी 1,को.बोबलाद 1,वळसंग 1,शेगाव 2, जा.बोबलाद 2, पाच्छापूर 1, उमराणी 3,अंकलगी 3, उटगी 2, सोन्याळ 2, येळवी 1, सोर्डी 1,रा.वाडी 2, बसर्गी 1, हिवरे 3, कोळगिरी 6, पांढरेवाडी 1, जाल्याळ बु 2, गुगवाड 4,तिकोंडी 5, व्हसपेठ 1, भिवर्गी 6, 





कोसारी 1, बनाळी 1, खोजानवाडी 10, शेडयाळ 2, आसंगी जत 2,बेळोंडगी 1, रामपूर3,बागेवाडी 8, मिरवाड 4,मोटेवाडी 1, दरिबडची 5, वज़वाङ 1,करेवाडी को 5, खिलारवाडी 1, लकडेवाडी 1, येळदरी 1, करजगी 1, जाल्याळ खु 2, लवंगा 1,आक्कळवाडी 1, बोर्गी खु 3, हळळी 1 यामुळे तालुक्यातील एकूण कोरोना बाधित संख्या 7517 वर पोहचली असून 5233 जण कोरोनामुक्त झाले आहेत.





तालुक्यातील 152 जणांचा दुर्देवी मुत्यू झाला आहे. अजूनही कोरोनाचा प्रभाव कायम असून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे, खाजगी दवाखान्यात कोरोना सदृश लक्षणे असलेल्या रुग्णाची कोरोना तपासणी करावी,अन्यथा ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी घेण्याच्या सुचना द्याव्यात,जेणेकरून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी करण्यात प्रशासकीय यंत्रणेला मोठी मदत मिळेल.






त्याशिवाय नागरिकांनी कोणतीही भिती न बाळगता संशयास्पद लक्षणे आढळल्यास शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रे अथवा जत,माडग्याळ ग्रामीण रुग्णालयात तपासणी करावी,वेळीच उपचार झाल्यास कोरोना पुर्णत; बरा होतो,त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here