जत,संकेत टाइम्स : येळवी प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे व पंचायत समिती सदस्या मंगलताई जमदाडे यांनी पुढाकार घेतला आहे.पं.स.सदस्या मंगलताई जमदाडे यांच्या 15 व्या वित्त आयोग अंबधित निधीतून येळवी येथे 5 ऑक्सीजन बेड व तालुक्यातील अन्य प्राथमिक आरोग्य व उपकेंद्रांना कोरोना लढाईत गरज असणारी उपकरणे तात्काळ खरेदी करून द्यावीत अशी मागणी जमदाडे यांनी केली आहे. तसे निवेदन पंचायत समितीला देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि,
सध्या तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कोरोना काळात मोठ्या संकटाचा सामना करत आहे.अपुरा कर्मचारी वर्ग,अपुरी उपकरणे असतानाही प्रचंड संख्येने वाढत असलेल्या कोरोना रुग्णावर उपचार करत त्यांना कोरोना मुक्त करण्याची लढाई लढत आहे.सध्या या प्राथमिक आरोग्य व उपकेंद्रांना कोरोना रुग्णांवर उपचारासाठी साहित्य तातडीने पुरविण्याची गरज आहे.त्यामुळे पंचायत समिती स्तरावरील 15 वा वित्त आयोग अंबधित निधीतून येळवी प्राथमिक आरोग्य केंद्रात 5 ऑक्सीजन बेड तात्काळ उपलब्ध करून रुग्णांना दिलासा द्यावा.
तसेच तालुक्यातील. अन्य सात प्राथमिक आरोग्य केंद्रे,उपकेंद्राना 15 वित्त आयोग अबंधित निधीतून 2,000 एन 95 मास्क,2000 फेस शिल्ड,200 पिपीई किट,2,000 हँडग्लोज,500 लीटर सँनिटायझर,41 ऑक्सीमीटर,41 टेप्रेंचर मशीन तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात,असे निवेदनात म्हटले आहे.
पंचायत समितीच्या 15 वित्त आयोगाच्या अबंधित निधीतून प्रा.आ.केंद्रांना साहित्य पुरविण्याचे निवेदन देताना प्रकाश जमदाडे व मंगलताई जमदाडे







