
जत,संकेत टाइम्स : जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक उत्तम जाधव यांचे आकस्मिक निधन झाले आहे.
रविवार सकाळी त्यांच्या मुत्यू बातमी आल्यानंतर जत पोलीस ठाणे हळहळे,मनमिळावू,शांत स्वभावाचे असलेले जाधव यांनी त्यांच्या कार्यकाळात उत्तम काम केले आहे.
गेल्या पंधरा दिवसापुर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.सांगली येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.उपचार सुरू असताना त्याचे रविवारी निधन झाले.
पोलीस दलातील शांत व तितकाच कतृव्यदक्ष अधिकारी यांचे असे आकस्मिक निधन मनाला चटका लावून गेले आहेत.






