कोरोना बाधित कुटुंब आणि मानसिक आधार

0
3



कोरोना संबंधी उपचार चालू असताना रुग्णांच्या मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच, बाधितांच्या कुटुंबाचे स्वास्थ्यही या काळात मोठ्या प्रमाणावर बिघडत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा वेळी बाधितांसह त्यांच्या कुटुंबाला मानसिक आधार देण्याची गरज समाजाची आहे.

उपचारादरम्यान विलगिकरणात राहणे, कुटुंबाची ताटातूट होणे, यामुळे रुग्णाच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो.   कोरोनाचा आघात शरिराबरोबरच मनावरही मोठ्या प्रमाणावर होतो. अशा वेळी रुग्णाला मानसिक आधाराची गरज आहे.

नैराश्य, काही करावेसे न वाटणे, शारिरिक थकवा जाणवणे. काळजी,भीती,रूग्ण अशी लक्षणे दिसू लागल्यास घाबरून न जाता शांत राहावे.






मित्रांशी फोनवर बोलत राहावे.योगासने, ध्यान धारणा करणे आवश्यक आहे.कोरोना काळात कुटुंबात एकमेकांना धीर द्यावा  ”कोरोनातील विलगिकरणामुळे रुग्णाची मानसिकता खचते, कुटुंबालाही भीतीने ग्रासल्यासारखे होते म्हणून कोरोना बाधित कुटुंबाला मानसिक आणि भावनिक आधार देण्याची गरज समाजाची आहे.तसेंच समाजाने प्रशासनाच्या नियमाचे पालन करून, प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे आहे.


 

श्री.बसवराज येलगार (गुळवंची)

जिल्हा उपाध्यक्ष शिक्षक संघ सांगली

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here