कवठेमहांकाळ : ढालगांव (ता. कवठेमहांकाळ) येथील स्वराज कलेक्शनच्या वतीने कोबिड रूग्णांना मोफत जेवण देत सामाजिक बांधिलकी जपली.
स्वराज कलेक्शनचे मालक अजितराव खराडे यांनी सामाजिक बांधिलकीची
जाणीव ठेवून मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे ध्येय उराशी बाळगून हे कार्य सुरू केले आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना बाधीत रूग्णांची संख्या वाढत आहे.कोरोनामुळे आर्थिक, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य
बिघडून गेलेल्या रुग्णांना मायेचा आधार देण्याचे महत्वपूर्ण कार्य करून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.असा धीर देण्याचा प्रयत्न अजितराव खराडे यांनी केला आहे. खराडे हे सेवानिवृत्त सैन्य अधिकारी असल्याने सेवा त्यांच्या नसानसात देशभक्ती आहे,त्याचाच प्रत्यय खराडे यांनी जपलेल्या बांधिलकी दिसून येत आहे.
ढालगाव (ता.कवठेमहांकाळ)येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नव्यानेच कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये सध्या कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील कवठेमहांकाळ, जत सांगोला परिसरातील रूग्ण दाखल आहेत.त्यांना खराडे यांनी मोफत जेवण दिले आहे.सध्या कोरोना काळात प्रत्येकजण आपल्या परीने मदतीचा प्रयत्न करत आहेत. खराडे यांनी केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद असून अन्य दानसूर लोंकानी अशा पध्दतीने पुढाकार घेण्याची गरज आहे.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.रावसाहेब रुपनर,डॉ.अभिजित सांगलीकर,उज्वला
शेजूळ, अमोल साठे, समाधान खरात, हणमंत मोहिते,कुंडलिक काळे, विद्या बुवा, रुपाली गोंजारे, लता सुतार यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.या मदतीबद्दल केंद्रातील डॉक्टर्स,रुग्ण,नातेवाईकांनी अजितराव खराडे यांचे आभार मानले.
ढालगाव ता.जत येथील कोविड सेंटरमधील रुग्णांना स्वराज्य कलेक्शन कडून जेवन देण्यात येत आहे.








