बनशंकरी नर्सरी (अंतराळ) चा केशर अंबा ठरतोय अप्रुप

0
48



जत,संकेत टाइम्स : अंतराळ येथील दुष्काळातील ओयाशिस ठरलेल्या बनशंकरी नर्सरीचा केसरी आंबा जतकराचे अप्रुप ठरत असून थेट झांडावरून काढलेला अंबा नैसर्गिक पध्दतीने पिकविला जात असून फक्त 100 रुपये किलो दराने नर्सरीचे संचालक काकासो सांवत यांनी आंबा खव्ययासाठी उपलब्ध केला आहे.

खडकाळ रानावर शेतीतील नैसर्गिक प्रयोग यशस्वी केलेली जत तालुक्यातील अंतराळची बनशंकरी नर्सरी महाराष्ट्रात विस्तार वाढवू पाहत आहे.






प्रत्येक वर्षाला तब्बल एक लाख केसर आंबा रोपाची विक्री करणाऱ्या बनशंकरी नर्सरीच्या संचालकांनी आंबा पिकांचे तंत्रज्ञान बदलत जत सारख्या दुष्काळी भागात कोकणातील अस्सल केसर आंबा पिकवून चांगले उत्पादन मिळवू शकतो,हे दाखवून दिले आहे. जत तालुक्यासह सांगली,कोल्हापूर,सातारासह कर्नाटकच्या सिमा भागात या नर्सरीच्या  सुमारे दहा लाख रोपाची विक्री झाल्याचे काकासाहेब सांवत सांगतात.या रोपामधील 98 टक्के आंबा रोपांचे यशस्वी उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे आंबा उत्पादन कोकण भागाशिवायही जत सारख्या दुष्काळी घेणे शक्य असल्याचे सिध्द केले आहे.






नर्सरीतच आठ एकर आंब्याची लागवड


बनशंकरी नर्सरीतच तब्बल आठ एकर आंब्याची सांवत बंन्धूनी लागवड केली आहे.येथे उत्पादित झालेला पिकलेला व हिरवा असा दररोज सुमारे दोनशे किलो आंबा थेट नर्सरीतून विकला जात आहे. आतापर्यत एक टन आंब्याची विक्री झाली आहे. पुढेही अजून पंधरा दिवस विकला जाईल इतका आंबा शिल्लक असल्याचे सांवत सांगतात.





एका झाडाला 22 प्रकारचे आंबे


बनशंकरी नर्सरीतील एका झाडाला 22 प्रकारचे आब्यांचे उत्पादन घेऊन काकासाहेब सांवत यांनी शेतीतील अविष्कार समोर आणला आहे.

प्रात्याक्षिक म्हणून केलेला एका झाडाला काकासाहेब सांवत यांनी केशर,लालबाग,केशर, हापूस, पायरी, रत्ना, सिंधू, आम्रपाली, मलगोबा, वनराज, बारोमासी, लालबाग, दुधपेढा, तोतापुरी, मल्लिका, सोनपरी, निलम, निरंजन, तैवान, क्रोटाॅन,दशेरी,बदाम , लंगडा, राजापुरी,अशा 22 प्रकारच्या वाणाचे कलम करत त्याचे उत्पादन घेण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे.

जत-सांगोला महामार्गापासून काही अंतरावर अंतराळ रोडला शेततील फळ रोपांची मालिका काकासाहेब सावंत यांनी उभी केली आहे.शेतकऱ्यांनी एकवेळ भेट द्यावीच,असे ओयाशिस बनाळीत निर्माण करण्यात आले आहे.



अंतराळ येथील बनशंकरी नर्सरीतच सावंत बन्धूंनी साकारलेला 22 कलमी अविष्कार

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here