कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव येथे नुतन होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या शासनमान्य व व्हेंटिलेटर, ऑक्सीजन बेड असलेले कोविड केअर सेंटरला जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली असून आज सोमवारी या सेंटरचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे,अशी माहिती संचालक मोहन माळी यांनी दिली.
मुंबई येथील राष्ट्रीय आरोग्य न्याय संशोधन संस्था संचलित नुतन मेडिकल कॅम्पसच्या परिसरात सुसज्ज इमारतीत व सर्व स्वतंत्र विभागात कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.संस्थेचे आधार स्तंभ डॉ.रामलिंग माळी,संस्थेच्या अध्यक्षा डॉ. नुतन माळी व डॉ.ऋतुज माळी यांच्या नियोजनानुसार हॉस्पिटल आकारास आले आहे.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद पोरे,तहसीलदार बी.जे.गोरे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दत्तात्रय पाटील,उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.सतीश गडदे यावेळी उपस्थित राहणार आहेत.







