दुष्काळी उमदीत कृष्णामाई अवतरलीटप्पा क्र.9 मधून म्हैसाळ योजनेचे पाणी दाखल

0
11



जत,संकेत टाइम्स : कायम दुष्काळी असा ठपका असलेल्या जत‌ तालुक्यातील उमदी येथे कृष्णामाईचे पाणी दाखल झाले आहे. गेल्या अनेक तब्बल दोन दशकानंतर अखेर खरी गरज असणाऱ्या भागात पाणी दाखल झाल्याने जल्लोष करण्यात येत आहे.

तत्कालीन मंत्री नेते स्व.राजारामबापू पाटील यांचे जतच्या शेवटच्या टोकापर्यत पाणी पोहचविण्याचे स्वप्न सत्यात उतरल्याचे यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य अँड.चन्नाप्पा होर्तीकर यांनी सांगितले.

जत पुर्व भागातील उमदी परिसरातील पाणी प्रश्न यामुळे कायमस्वरूपी मिटणार असून आमचे नेते जलसंपदा तथा जिल्ह्याचे‌ पालकमंत्री जयंत पाटील यांनी आपला शब्द खरा केला असून त्यामुळे भागात‌ हरितक्रांती होणार हे निश्चित झाले आहे.






लकडेवाडी येथून टप्पा क्र.9 मधून बंधिस्त पाईपलाईन द्वारे उमदी येथे हे पाणी दाखल झाले असून यापुर्वी येळवी,निगडी,येळवी येथेपर्यत पाणी आले होते.ते पुढे उमदीपर्यत नेहण्यात आले आहे.यासाठी आम्ही पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते.ते स्वप्न सत्यात‌ उतरल्याचे पाटील व होर्तीकर यांनी सांगितले.







उमदी येथे आलेल्या पाणी पुजन सह लोकनेते स्व.राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादीचे नेते ॲड.चन्नाप्पान्ना होर्तीकर,युवक तालुका उपाध्यक्ष फिरोज मुल्ला, ओबीसी सेलचे तालुका सरचिटणीस इस्माईल सय्यद, ग्रामपंचायत सदस्य राजू मकानदार, चिदानंद रगटे,आर.डी.सातपुते, पिंटू शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शेतकरी उपस्थित होते.


दुग्धशर्करा योग,बापूचे स्वप्न पुर्ण झाल्याचा आंनद


बंदीस्त पाईपलाईनद्वारे कृष्णा माईचे पाणी आज उमदी येथे दाखल झाल्याने माझे शेतकरी बांधव मोठा जल्लोष करत आहे.माझ्या या बांधवांचा आनंद पाहताना मलाही प्रचंड आनंद होत आहे.खरंतर हा माझ्यासाठी दुग्धशर्करा योग आहे. जत तालुक्यात पाणी आणण्याचे स्वप्न स्व. राजारामबापू यांनी पाहिले होते, ते स्वप्न आज पूर्ण झाले आहे तसेच जत तालुक्याला दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आलो आहोत त्यासाठीचे आज पहिले यशस्वी पाऊल पडले असं मी मानतो !,अशी पोस्ट‌ फेसबुकवरून करत पालकमंत्री जयंत पाटील यांनी जतला दुष्काळ मुक्त करू,असा संदेश दिला आहे.





उमदी ता.जत येथे म्हैसाळ योजनेतून आलेल्या पाण्याचे पुजन करताना अँड.चन्नाप्पा होर्तीकर व मान्यवर



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here