2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ घ्यावा ; दिलीपकुमार हिंदूस्तानी

0
4



जत,संकेत टाइम्स ; ‌ कोरोना लसीकरण करणाऱ्या 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ घ्यावा,अशी मागणी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेने मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे कि,

कोरोना लसीकरण काम करणाऱ्या 2005  नंतर सेवेतील शिक्षक कर्मचारी यांना कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करावी,ग्रामपंचायत स्तरावर लसीकरण नोंदणीसाठी 2005 नंतर सेवेत असलेल्या कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या लसीकरण साठी नियुक्त कर्मचारी यांना पेन्शन नाही.सध्या कोव्हीड19 ची महामारी असल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका आहे.






सध्या सर्व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सेवा करीत आहेत.जर एखाद्या कर्मचारी यांचे कोरोना ड्युटीवर असताना बरे-वाईट झाल्यास त्यांचे कुटुंब उघड्यावर पडण्याची शक्यता आहे.त्यामुळे सदर कर्मचारी यांना कुटुंब निवृत्ती वेतन (पेन्शन)चा लाभ देण्याचा निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा,अशी मागणी केल्याचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीपकुमार हिंदूस्तानी यांनी सांगितले. 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here