जत,संकेत टाइम्स : आसंगीतुर्कला शेतकऱ्यांच्या मागणीवरून पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडण्यात आले आहे,यात आमदारांसह,अन्य कोणत्याही नेत्यानी श्रेय घेऊ नये,सामूहिक प्रयत्न करून या भागातील शेतकऱ्यांच्या उन्नत्तीसाठी प्रयत्न करूयात,असे आवाहन हणमंत गडदे,सुभाष कांबळे यांनी केले आहे.
गडदे म्हणाले,आंसगीतुर्क तलावातून पाणी टंचाईची तीव्रता वाढल्याने पांडोझरी वडापात्रात पाणी सोडावे यासाठी आम्ही 16 शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला होता.पाटबंधारे विभागाचे अभियंता मोरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे.तालुका स्तरीय सर्व नेत्यानी येथे पाणी सोडावे म्हणून आपल्या परीने मदत केली आहे. त्यामुळे आमदार विक्रमसिंह सांवत, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांचेच फक्त प्रयत्न आहेत,हे श्रेयवाद आहे.
त्यामुळे कुणीही आपले व्यक्तिगत श्रेय घेऊ नये,आम्ही शेतकरी सातत्याने संबंधित विभागाकडे मागणी लावून धरली होती.पांडोझरीतील पाणी टंचाई,आंसगीतुर्क तलावातील पाणी साठा याबाबत वस्तूनिष्ठ स्थितीच्या आधारे पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे व्यक्तिगत एका पक्षाचे,नेत्याने यासाठी प्रयत्न केले म्हणणे चुकीचे आहे,असेही गडदे यांनी म्हटले आहे.
आंसगीतुर्क तलावातून पांडोझरीत आलेल्या पाण्याचे शेतकऱ्यांनी स्वागत केले.







