आजपासून शिंगणापूरमध्ये सर्व्हे ; दिग्विजय चव्हाण | कोरोना विरुद्धची लढाई जिंकू

0
14



जत,संकेत टाइम्स : डफळापूर परिसरातील गावात वाढलेला कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण मैदानात उतरले आहेत.डफळापूर सह परिसरातील मिरवाड,जिरग्याळ,कुडणूर,शिंगणापूरअंकले,बाज,वाषाण कंठी,खलाटी,बेंळूखी या गावात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांकडून भिती बाळगून कोरोना सारखा गंभीर आजार अंगावर काढण्याचे प्रकार घडत होते.त्यामुळे चव्हाण यांनी प्रत्येक गावात जाऊन कोरोना तपासणी करण्याच्या सुचना दिल्या होत्या.गेल्या दोन दिवसापासून मिरवाड येथे संशय व लक्षणे असणाऱ्या नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यात सुमारे 75 जणाच्या तपासणीत तब्बल 17 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यांची तपासणी करून औषधे देण्यात आली आहेत.त्याचे घरातच विलगीकरण करून आशा वर्कर्स,डॉक्टर यांच्याकडून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.

आज अशाच पध्दतीने शिंगणापूर येथे तपासणी करण्यात येणार आहे.

चव्हाण म्हणाले,डफळापूर सारख्या मोठ्या गावात कोरोना रूग्ण दिवसन् दिवस वाढत आहेत.कोरोना रोकण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरले असून तातडीने उपाय योजना करण्याची गरज आहे. अन्यथा विस्फोट झाल्यावर जागे होऊन उपयोग होणार नाही.येत्या आठवड्यात सर्व गावातील संशयास्पद वाटणाऱ्या नागरिकांनी अन्टेजन टेस्ट करण्यात येणार आहे.नागरिकांनी कोणत्याही प्रकारे घाबरून जायाचे नाही,आम्ही सर्व प्रकारे नियोजन करत आहोत.डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्र स्थानिक ग्रामपंचायती मार्फत कोरोना रोकण्यासाठी दक्षता घेत आहोत.कोणत्याही नागरिकांना तशा अडचणी अथवा आरोग्य विभागाकडून सहकार्य मिळत नसल्यास संपर्क करण्याचे आवाहनही चव्हाण यांनी केले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here