कोंतेबोबलाद, संकेत टाइम्स : कोंतेबोबलाद ता.जत येथील ग्रामपंचायत सदस्य तथा कॉग्रेस नेते रमेश आप्पासाहेब माळी यांनी रमजान ईदनिमित्त गरीब,गरजू मुस्लिम बांधवाना प्रत्येकी 1 किलो साखर 2 लीटर दुधाचे वाटप केले.
कोरोना लॉकडाऊनच्या काळात मुस्लिम बांधवांना सामाजिक बांधिलकी म्हणून मदतीचा हात दिला आहे.यावेळी ग्रामपंचायत सरपंच पुंडलिक कांबळे,सदस्य मुरलीधर जगताप,माजी उपसरपंच हमीदअल्ली मुल्ला,तुकाराम जगताप, साहेबलाल शेख,बबन जगताप,आनंदराव जगताप,मोहन शिंदे, लक्ष्मण शिरशाड,रफिक पटेल,सुरेश माळी, महादेव बिराजदार आधी सर्व धर्मीय बांधव उपस्थित होते.
ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना साखर व दुध वाटप करण्यात आले.






