उमदीत‌ कोविड सेंटरचे उद्घाटन

0
6



जत,संकेत टाइम्स : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर उमदी येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते चाळीस ऑक्सिजन बेडचे कोविड केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. विक्रम फाऊंडेशनच्या माध्यमातून हे कोविड सेंटर कोरोना बाधित रुग्णांना सोयीचे ठरणार आहे.



फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत कोरोना काळात रुग्णांची सोय केली आहे.माणुसकीच्या दृष्टीकोनातून उमदी येथील सर्व डॉक्टरांकडून येथे दाखल  रुग्णावर उपचार करण्यात येणार आहेत.यावेळी प्रांताधिकारी प्रशांत आवटे,जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पाराया बिराजदार,माजी सभापती बाबासाहेब कोडग,विक्रम फाऊंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम,कॉंग्रेस नेते निवृत्ती शिंदे,प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.गुरव व डॉ.सुंशात बुरकुले तसेच उमदी जिल्हा परिषद गटातील सर्व सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते. ग्रामीण भागात या कोविड सेंटर मुळे रुग्णाना वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार आहे. 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here