कोरोना बाधित लहान मुलासाठी सोलापूर, सांगली जिल्ह्यातील पहिले कोविड रुग्णालय पंढरपूरात सुरू होणार

0
4

पंढरपूर : देश राज्यभरात आलेल्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात  लहान मुलांमध्ये कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.मात्र मुलांवर उपचाराची सोय कुठे उपलब्ध नव्हती.




आता अशा मुलावर उपचारासाठी पंढरपूर येथे पहिले कोविड हॉस्पिटल सुरु होत आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी डॉ. शीतल शहा यांच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक निर्णय देण्याची भूमिका घेतल्याने आता अशा लहान मुलांच्या उपचारांची सोय होणार आहे.






कोरोना बाधित गरोदर महिलांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार बालकापर्यत पोहचत‌ आहे.परिणामी बालके,मुले कोरोनाबाधित होत असल्याने त्यांच्या उपचाराचा प्रश्न उभा राहिला होता.पंढरपूर येथील ज्येष्ठ बालरोग तज्ञ असलेले डॉ.शीतल शहा यांनी अशा लहान ‌बालकांवर उपचार करण्यासाठी पाऊस उचलले असून त्यांनी बालकांचे कोरोना रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दिला होता.





अखेर सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रस्तावास सकात्मक प्रतिसाद दिला आहे.सोलापूर, सांगली जिल्ह्यातील पहिले बालकांचे कोरोना रुग्णालय सुरू होणार आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here